तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे केले स्वागत


प्रतिनिधी वैजापूर 
येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारीपद गेल्या काही वर्षांपासून रिक्त होते. या पदावर रामेश्वर खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंगणवाडी कर्मचारी असोसिएशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 
 रामेश्वर खडसे यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पदाचा दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला. अंगणवाडी कर्मचारी असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्षा माया म्हस्के यांच्यासह पुष्पा जाधव,  अश्विनी बरकसे, गीतांजली पहाडे, सोनाली मगर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कॅपशन 
वैजापूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून रामेश्वर खडसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अंगणवाडी कर्मचारी असोसिएशनच्या राज्य उपाध्यक्षा माया म्हस्के यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

No comments:

Post a Comment