तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

शिवजयंती निमित्त टाकळगव्हाण येथे बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन


प्रतिनिधी 
पाथरी:-तालुक्यातील टाकळगव्हाण येथे ं शिवाजी महाराज यांच्या 389 अव्या जयंतीनिमित्त ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे
    तालुक्यातील टाकळगाव येथेत प्रतिवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते यावर्षीही ही शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण ह .भ .प . बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन रविवार दिनांक 3 मार्च रात्री आठ वाजता संत तुकाराम महाराज मंदिर  येथे आयोजित केले आहे .यावेळी विधानपरिषदेचे सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी,आमदार विजय भांबळे परभणी जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर ,जि. प. परभणी च्या शिक्षण व आरोग्य सभापती भावनाताई नखाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे पंचक्रोशीतील शिवभक्तांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शंभुराजे जे मित्र मंडळ टाकळगव्हाण यांनी केले आहे

No comments:

Post a Comment