तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

आज नंदागौळ येथे ८४लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामांचा ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ!


परळी(प्रतींनिधी) परळी तालुक्यातील नंदागौळ येथे ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 84 लक्ष रुपयांच्या मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासह विविध विकास कामांचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते ना.धनंजयजी मुंडे यांच्या हस्ते आज ८ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती युवानेते सुंदर गित्ते यांनी दिली आहे.

       याबाबत सविस्तर वृत्त की मागील अनेक दिवसा पासून नंदागौळ येथे ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचे युवानेते सुंदर गित्ते हे अनेक विकासाचे कामे करत आहेत,त्यातच गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी राज्याच्ये विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा सुरूच होता त्या माध्यमातून ८४ लक्ष रुपयांची मुख्यमंत्री पेयजल ही पाणी पुरवठा योजना याच बरोबर २५१५ योजने अंतर्गत २५ लक्ष रुपयांचे विविध विकासकामे त्यात खंडोबा मंदीरासाठी सभागृह, गावांतर्गत सिमेंट रस्ते,दलित स्मशानभूमी बांधकाम,०६ ललक्ष रुपयांचे पथदिवे तसेच गावातील गरजू २१ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ३ लक्ष रुपयांच्या सिंचन विहरीच्या कामांसह अनेक कामांचा शुभारंभ विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती युवानेते सुंदर गित्ते यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment