तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

कै. श्रीनिवास शिंदगी राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कारासाठी आवाहन


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
सांगली - येथील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध बालसाहित्यिक श्रीनिवास शिंदगी यांच्या स्मरणार्थ महावीर सार्वजनिक वाचनालय दक्षिण शिवाजी नगर सांगली यांच्यातर्फे यंदाच्या वर्षीपासून बालसाहित्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे. साहित्यिक आणि प्रकाशकांनी या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
बालकथासंग्रह, बालकविता संग्रह, बाल कादंबरी, बाल नाटक, एकांकिका आणि इतर अशा पाच विभागात हे स्वतंत्र राज्यस्तरीय पुरस्कार असतील. प्रत्येक प्रकारातील एका सर्वोत्कृष्ट पुस्तकास पुरस्कार देण्यात येईल. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप असेल. तरी साहित्यिक व प्रकाशकांनी 01 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत प्रसिद्ध झालेले आपले साहित्य, महावीर सार्वजनिक वाचनालय द्वारा 'अमृतवेल', रेव्हेन्यू कॉलनी, महापालिका शाळा नंबर 34 च्या मागे, दक्षिण शिवाजी नगर सांगली. 416 416 या पत्त्यावर दिनांक 15 एप्रिल पूर्वी पाठवावेत, असे आवाहन कार्यवाह, महावीर सार्वजनिक वाचनालय यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल संपर्क 98220 83302 आणि 94055 53778

No comments:

Post a Comment