तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 March 2019

मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाबद्दल तहसिलदार यांना निवेदन

________________________________

वार्ताहर सिल्लोड :- मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यांसाठीचे लेखी निवेदन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विविध शासकीय योजना मार्गदर्शन केंद्र समिती च्या वतीने आज ता.०६ रोजी सिल्लोड तहसिल कार्यालयाचे तहसिलदार रामेश्वर गोरे यांना देण्यात आले. 
             मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ ब क ड वर्गवारीनुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे हा प्रश्न गेल्या ४० वर्षापासून शासनदरबारी प्रलंबित आहे हा प्रश्न मार्गी लावावा यांसाठी महाराष्ट्र भरातून असंख्य संघटनांनी विविध मोर्चे, आंदोलने, निदर्शने, मुंडने केली परंतु अद्यापही हा विषय शासनदरबारी प्रलंबित आहे *हाच स्वतंत्र आरक्षणाचा विषय घेऊन काल ता.०५ मार्च रोजी साळेगांव ता.केज जि.बीड येथील संजय ताकतोडे या नवयुवकाने बीड येथील धरणात जलसमाधी घेतली* मग हा प्रश्न जर असाच प्रलंबित राहिला तर शासन अजुन किती लोकांचे बळी घेणार हा प्रश्न सध्या समाजाला भेडसावत आहे. एकीकड़े मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे तर दुसरीकडे समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकास होणारा मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे म्हणून हा प्रश्न मा.ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांनी तात्काळ मार्गी लावावा व समाजाला योग्य न्याय द्यावा असे लेखी निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
          याप्रसंगी महसूल अव्वल कारकुन आशीष औटी, समितीचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव दणके, मार्गदर्शक संदीप मानकर, महाराष्ट्र संघटक एकनाथ शिंदे, तालुका सचिव सुनिल साळवे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा मीराबाई गायकवाड, शाखाध्यक्ष सोनाबाई गायकवाड, शाखाध्यक्ष परमेश्वर दणके, राहुल दणके, रामेश्वर दुतोंडे, सचिन दणके, विजय सोनवणे, प्रवीण शिंदे, वामन जाधव, गजानन अंभोरे, हरिदास कांबळे, शंकर पारधे, रतन सौदागर भिकन कांबळे, देविदास भोरकडे आदींची उपस्थिती होती....!!
      
         --------------- ● ● ---------------

No comments:

Post a Comment