तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 March 2019

शेतकरीचे १ लक्ष रुपये असलेली पिशवी लंपास


संग्रामपुर [ प्रतिनिधी] शेतकरीने विकलेल्या कापुसाच्या रकमे मधुन जवळ असलेल्या १ लाख रूपये रसवंतीवर रस पिण्यास जाणे भवले अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्या जवळचे १ लक्ष रुपये लंपास केल्याची घटना वरवट बकाल बस स्थानक येथे दुपारी ४ वाजता दरम्यान घडली थोडक्यात हकिकत असे कि
शेतकरी अशोक पांडुरंग महाले रा कळमखेड यांनी कापुस विकला व विकलेल्या कापसाची रक्कम 3 लाख रुपये ३ पैकी २ लक्ष रुपये बॅक खाते पुस्तकात टाकली व १ लक्ष रुपये मोटार सायकलच्या डिक्कीत ठेवले होते दुचाकी पंमचर झाल्याने शेतकरीच्या मुलाने दुचाकी पंमचर काढण्यास दुकानवर लावली रक्कम असलेली पिशवी सोबत घेऊन  वरवट बकाल बस स्थानकावर एका रसवंतीवर थांबुन रस घेण्यास दुकानात गेले रस घेऊन बाहेर निघतांना रककम ठेवलेली बॅग अज्ञात व्यक्तीने लंपास केली याबाबत वृतलिहे पर्यत पोलीसात संबंधीत शेतकरीने पिशवीतील १ लक्ष रुपये रककम लंपासची लेखी तक्रार केली नव्हती परंतु तामगाव पोलीसांनी बसस्थानक परिसरात दुकानात लावलेल्या सी सी टीव्हीचे फुटेज ची चौकशी केली परंतु यात सदर रसवंतीचे फुटेल आलेच नसल्याने संबंधीत शेतकरी हताश झाला

No comments:

Post a Comment