तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

कामगारांनी लढ्यासाठी कायम तयार राहावे- माजी आ.जयप्रकाश छाजेडइंटक संघटनेच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून सहभागी होणार - अजय मुंडे


 कामगारांच्या लढ्यासाठी इंटक कटिबध्द-दत्तात्रय गुट्टे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-  केंद्र व राज्य सरकार खाजगीकरण करण्यावार भर देत आहे. सरकारचे हे धोरण कामगारांच्या भविष्यासाठी धोकादायक असुन येणार्‍या काळात सरकारी नौकर्‍या जवळपास बंद होणार आहेत. याबरोबरच सरकारचे नियंत्रण असणार नाही. अशा या काळात सध्याच्या मोठ्या पदावरील अधिकार्‍यासह कामगारांनी लढ्यासाठी तयार व्हावे असे आवाहन इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केले आहे. तर इंटक ही संघटना कामगारांच्या लढ्यासाठी कायम तत्पर असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांनी केले.  ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वीज कामगारांची भूमिका अत्यंत मोलाची असुन वीज कामगारांच्या न्याय, हक्कांसाठी ना.धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला येणार्‍या काळात ना.मुंडे यांच्या माध्यमातुन इंटक संघटनेच्या लढ्यात यापुढे खांद्याला खांदा लावून सहभागी होणार असल्याचे जि.प.सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) या संघटनेचे राज्यस्तरीय त्रेवार्षिक अधिवेशन बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत परळी वैजनाथ येथे संपन्न होत आहे याचा आनंद तर आहेच पण माझ्यासाठी समाधानाची बाब आहे, इंटकच्या त्रेवार्षिक अधिवेशनात आज परळी येथील गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिर येथे पार पडले.  ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून व्यवस्थापनाने अनेक प्रभावी उपाय योजना केल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांना बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत, ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वीज कामगारांची भूमिका अत्यंत मोलाची आहे, सुविधा देत असताना ग्राहकांचा त्रास कमी करून ही ऑनलाइन यंत्रणाही सुरळीत कशी राहील याची दक्षता देखील घेतली गेली पाहिजे असा सल्लाही यावेळी मान्यवरांनी दिला

धनंजय मुंडेंचा प्रतिनिधी म्हणून मी आज या अधिवेशनात उपस्थित राहून शुभेच्छा देत आहे असेही अजय मुंडे म्हणाले. वेळोवेळी वीज कामगारांच्या न्याय, मागण्यांसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात आवाज उठवलेला आहे; यापुढेही ते आपल्या हक्कासाठी या संघर्षात त्यांचा सक्रिय सहभाग असेलच यात शंका नाही असा विश्वास यावेळी उपस्थित कामगारांना ना. मुंडेंच्या वतीने अजय मुंडे यांनी दिला.
या अधिवेशनात इंटकच्या माध्यमातुन कामगारांच्या व हिंताच्या संदर्भातील ठराव पास करण्यात आले.  महावितरण महानिर्मिती महापारेषण या तिन्ही कंपनीतील रिक्त जागा तात्काळ भराव्यात अनेक अनुकंपत्वावरील वारसांना नोकरीमध्ये कायम पदावर सरळ भरतीने घेण्यात यावे महानिर्मिती कंपनीतील 210 मेगावॅटचे सुस्थितीतील असलेले तसेच हायड्रॉपॉवर स्टेशन बंद करू नये महावितरण मध्ये होऊ घातलेले पुर्ण रचना रद्द करावी तिन्ही कंपनीतील कामगारांना पेन्शन योजना तात्काळ चालू करावी मागील काही वर्षापासून रखडलेल्या बदल्या विनाअट करण्यात याव्यात महावितरणचा आत्मा असलेली मीटर रेडींग कंट्राक्टदाराकडून न करता कर्मचार्‍यांची भरती करून कर्मचार्‍यांच्याच मार्फत करण्यात यावी. 1/3 ग्रॅज्युटी पूर्वीप्रमाणेच मिळावी जी.ओ,74 विना अट लागू करावा रोजंदारी कर्मचार्‍यांचा जी.ओ 74 देताना रोजंदारी कार्यकाळ ग्राह्य धरावा स्वेच्छतेचा निवृत्ती योजना सर्व स्तरावरील कामगारांना लागू करावी अशा अनेक मागण्या या त्रैवाषिक  अधिवेशनातुन करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंटकचे अध्यक्ष तथा माजी आ.जयप्रकाशजी छाजेड, उद्घाटक इंटकचे कार्याध्यक्ष महेद्र घरत, मुख्य महासचिव हिंदुराव पाटील, परळी मार्केट कमिटीचे माजी सभापती सूर्यभान नाना मुंडे, पंचायत समितीचे उपसभापती बालाजी मुंडे इंटकचे सचिव मुकेश तिंगाटे, मुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण पी.एस.पाटील,  मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महापारेषण आनंत पाटील, वीज इंटक कार्याध्यक्ष वामनराव जाधव, वीज इंटकचे सरचिटणीस गजानन अवचट (काका), चंद्रशेखर पुरंदरे, वीज इंटकचे उपाध्यक्ष सुनिल चौधरी, पि.एस.पाटील, एस.एन.चौघुले, संदिप वंजारी, एम.बी.जाधव, इंटकच्या सेक्रेटरी सौ.निलोफर मँडम, खजिनदार अहिरवाडी, इंटकचे उपाध्यक्ष आक्तर अलीखान , माधवी गायकवाड, देवानंद सुरवसे (उस्मानाबाद), सुरेश देवकर (बारामती), योगेश जगदाळे, हरिश्‍चंद्र रोटे, दिलीपराव लोंढे, अनिल केसकर, शिवाजी घाडगे, कार्यकारी अभियंता अंबाजोगाई मंदार वग्यानी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता परळी नितीन थेटे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष तथा इंटकचे कार्याध्यक्ष दत्तात्रय गुट्टे, इंटक संघटनेचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment