तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

ईपीएस पेंशन धारकांचा केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात परळीत जेलभरो आंदोलन
 परळीवैजनाथ(प्रतिनिधी) :-  शहरातील आण्णाभाऊ साठे चौक बस स्थानक समोर आज दि. 07 रोजी.सकाळी 11 वाजता जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत जोरदार घषणा करण्यात आल्या. या जेल भरो आंदोलनास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पाठिंबा ; ईपीएस पेन्शन धारकांच्या जेलभरो आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ.संतोष मुंडे यांनी सहभाग नोंदवून आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला व आंदोलन कत्र्यांच्या मागण्या न्याय असुन या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी डाँ.संतोष मुंडे यांनी केली. 

ईपीएस 95 च्या पेंन्शनरांने देशाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, त्या योगदानांची दखल म्हणून सुप्रिम कोर्टाने ईपीएस 95 च्या पेंन्शनरांना पेंन्शनवाढ व्हावी यासाठी क्रांतीकारी निर्णय घेतला मात्र हे केंद्रसरकार त्यावर गांभीर्याने विचार करत नाही चाल - ढकल करत कामगारावर अन्याय करत असल्यामुळे आज जेल भरो आंदोलन करण्यात आले. निवेदानाच्या प्रति शहर पोलिस स्टेशन व परळी तहसिलदार यांना देण्यात आली.
यावेळी कें.डी उपाडे व ईपीएस पेन्शन पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

केंद्रातील तत्कालीन राज्य सभेचे विरोधीपक्ष नेते तथा भाजपा प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पेंन्शनरांच्या अधिवेशनात पेंन्शनवाढ करण्याचे आश्र्वासन दिले होते, आमची सत्ता अणा सत्तेवर येताच 3 महिन्यात रु 3000/- रुपये व महागाई भत्ता देऊ अशा आशायाची भगत सिंग कोशियारी कमेटी मंजूर केली, (पिटीशन 147) परंतू अध्याप त्याची अमलबजावणी झालेली नाही. ईपीएस 95 च्या पेंन्शनरांना पेंन्शनवाढ व्हावी यासाठी क्रांतीकारी निर्णय घेतला मात्र हे केंद्रसरकार त्यावर गांभीर्याने विचार करत नाही.  अशा विश्वासघातकी केंद्रातील मंत्री प्रकाश जावडेकर यांना त्यांची जागा दाखऊ. त्यांचा बदला म्हणून येणा·या लोकसभा निवडणूकीत केंद्र सरकारला ''नो कोशियारी नो वोट'' असा निर्णय देशभरातील ईपीएस पेंन्शनधारकाणी घेतल्याचे के.डी.उपाडे यांनी सागितले.

No comments:

Post a Comment