तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

मोटार गाड्या व वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध


परभणी, दि.16 :-  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम  घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. आणि ज्याअर्थी निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थीतीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या/वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत, आणि ज्याअर्थी परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर,  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23.05.2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment