तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

आज मुंबईमध्ये जय जय 'बम बम भोले ' च्या गजरात महाशिवरात्रीचा उत्साह साजरा



प्रतिनिधी : बाळू  राऊत
मुंबई : दि ४ मुंबई मधील सुप्रसिध्द असे घाटकोपर मधील सुर्वोदय हॉस्पिटल मधील 72 फूट शिवाची मूर्ती विराजमान आहे .आणि त्यांच्या जटामधून अखंड अशी गंगा वाहते .विट्ठल रुख्मीनी चे भव्य आसे मंदिर आहे आणि असंख्य भाविकांची येथे गर्दी होते .म्हणून  प्रति पंढरपूर म्हणून या मंदिराकडे पहिले जाते .या मंदिरात जैन संस्क्रुतीचा देखील अनोखा संगम पाहण्यास मिळतो ती म्हणजे सर्वात मोठी महावीर जैन मूर्ती ,त्याच बरोबर येथे मराठी संंस्क्रुति चे देखील दर्शन होते संत  तुकाराम , संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ , संत जनाबाई , संत बहिणाबाई, गुजराती संक्रुतिचे देखील दर्शन होते संत जलाराम , संत मोरारी बापू , संत खेतर पालजी , श्रीकृष्णाच्या 105 मूर्ती येथे आहेत , तिरुपती बालाजी , साई बाबा , नागवर विराजमान श्रीकृष्ण, कमळाच्या आकाराचे मंदिरात देखील असंख्य मूर्ती आहेत .बारा ज्योतिर्लिंग ,दूर्गाचे अनेक अवतार देखील आहेत .आज सगळीकडे महाशिवरात्री निमित्त शिवमंदीरात भाविकांनी गर्दी केली आहे.अनेक रुग्णांना एक मायेचा आधार देवदेवतांच्या सान्निध्यात गेल्यामुळे मीळत असतो आणि त्यामुळे त्याचा आजार कोठे पळून जातो हे त्यांना देखील समजत  नाही त्यांच्या मनाला खूप असे समाधान मिळते .
घाटकोपर मधील पारशीवाडी येथे  कालेश्वर महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक , शिव जप , शिव पुराण पठनाचे कार्यक्रम आहे .त्याच बरोबर येथे एक गो शाळा आहे .आणि ती गो शाळा, बैठक रूम , आहे .असल्पा येथील महेश्वर मंदिर , मोहाली विलेज येथील मौहलेश्वर , पारशीवाडीतील पीमलेश्वर महादेव मंदिर ,पवई येथील  तूगरेश्वर महादेव मंदिरात  , पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
खैरानी रोडवरील प्राचीन जंगलेश्वर शिव मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्यात्याच बरोबर येथे शिवअमृत लीला पठन आणि  मंत्र जप पंडित करत आहेत .शिवाचे प्रसिध्द भांग येथे भाविकांना प्रसाद म्हणून मिळतो .या ठिकाणी मंदिराचा खूप मोठा हॉल आहे .आणि गरीब जनतेला कमी खर्चा मध्ये लग्नासाठी उपलब्द्ध करून दिला जातो .
मुंबईतल्या बाबूलनाथ या प्राचीन शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईतलं हे अत्यंत प्राचीन आणि उंच शिवमंदिर आहे. इथल्या टेकडीवर बाभळीचे झाड होते आणि त्यावरून बाबूलनाथ असं नाव पडलं. अशी आख्यायिका आहे. या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती या बाराव्या शतकातील म्हणजे राजा भीमदेवच्या काळातील आहेत. असं सांगितलं जातं
अंबरनाथ शहरातील ९५८ वर्ष अशा अतिप्राचीन शिवमंदिरातही रात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांची मोठी गर्द्दी पाहायला मिळतेय. महाशिवरात्रीनिमित्त इथे मोठी जत्रा भरते. अंबरनाथचे शिवमंदिर हे हेमाडपंथी असून शिलाहार राजा मुम्बानी यानं ९५८ वर्षा पूर्वी बांधल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे युनोस्कोनं जाहीर केलेल्या भारतातील अतिप्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. मध्यरात्री १२ वाजता शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता अंबरनाथ पालिकेने भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केली आहे.

No comments:

Post a Comment