तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : दि ०२ शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे व  रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात 10 हजार 101 इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार आहे आणि यातून शिक्षकांच्या भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परीश्रम करुन काम पूर्ण केले आहे.शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. शनिवार ( ता.2) रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर ही जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे. 
जाती वर्गनिहाय जागा सर्वसाधारण - 924, अनुसूचित जाती - 1704 , अनुसूचित जमाती - 2147 
अनुसूचित जमाती (पेसा) - 525 ,  व्ही. जे. ए. - 407 ,  एन. टि. बी. - 240 , एन .टी. सी. - 240 , एन. टी. डी. - 199 , इमाव - 1712  इ. डब्ल्यू. एस. - 540 ,  एस. बी. सी. - 209 , एस. ई. बी. सी. - 1154

No comments:

Post a Comment