तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

‘जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलास' कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत


मुंबई,दि.४:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलास' कार्यक्रमात ' राज्य आर्थिक दृष्ट्या सक्षम ' या विषयावर दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वित्त,नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची  विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. 
          
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दिनांक ०५ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत तर आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून 'दिलखुलास' कार्यक्रमात  बुधवार दि.६ ,गुरूवार दि.७ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. 
        
महाराष्ट्राचा अंतरिम संकल्प,दुष्काळनिवारणासाठी शासन कोणत्या उपाययोजना करत आहे, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अर्थसंकल्पातून कशाप्रकारे पाऊल उचलली आहेत, राज्यातील पायाभूत विकासाला गती देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, रोजगारक्षम महाराष्ट्र, राज्याचे वित्तीय आरोग्य सृदृढ ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयी सविस्तर माहिती दोन्ही कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment