तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

काम की बात करणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसला मतदान करा - बाबाजानी दुर्राणी


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची देशाच्या विकासाची पद्धती व विचारधारा ही समान आहे, लोकशाही टिकवण्यासाठी कार्य करणाऱ्या व मन की बात नाही तर काम की बात करणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या उमेदवारास मतदान करावे असे अवाहन बाबाजानी दुर्राणी यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर लोकसभेचे संभाव्य उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासंदर्भात बैठकीचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, मा. आ. व्यकंटराव कदम, राजेश विटेकर, विठ्ठलराव सुर्यवंशी, दशरथ सुर्यवंशी, लक्ष्मीकांतराव देशमुख, न. प. गटनेते चंद्रकांत राठोड, दत्ताराव कदम, कांतराव यादव, डिगांबरराव भाडूळे, मदनराव विटेकर, गोपाळराव भोसले, बाबुराव जाधव, मुंजाभाऊ धोंडगे हे मंचावर उपस्थित होते.
उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी राज्य व केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर व धोरणावर टिका केली, लोकांच्या भावनांशी खेळून रामंदिर मशिद हा वाद कायम ठेवला, पहले मंदिर, फिर सरकार ही घोषणा करणारे यावेळीही पहले सत्ता बाकी नंतर असे म्हणत आहेत, शेतकरी, व्यापारी व सामान्यांसाठी फक्त जुमलेबाजी करत आहेत असे मत व्यक्त करून काम करणाऱ्या आघाडीच्या उमेदवावारांना मत द्या असे अवाहन माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर यांनी व्यक्त केले.
तर मन की बात करून फक्त बोलाचाच भात व बोलाची कढी करणाऱ्यापेक्षा काम की बात करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवाराला संधी द्या असे अवाहन आ. बाबाजानी दुर्राणी यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी मनोगते इर्शादभाई कुरेशी,  दशरथ सुर्यवंशी, लक्ष्मिकांतराव देशमुख, चंद्रकांत राठोड, मा. आ. व्यकंटराव कदम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवमल्हार वाघे, प्रास्ताविक प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांनी तर आभार अँड. श्रीकांत विटेकर यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment