तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 March 2019

शिवसेना जनतेला दिलेला शब्द पाळते- उद्धव ठाकरे


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : दि.३ रत्नागिरी नाणार प्रकल्प होणार नाही, असा शब्द आम्ही दिला होता आणि तो पूर्ण केला आहे. शिवसेना जनतेला दिलेला शब्द पाळते, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.
नाणार प्रकल्पावरून महाराष्ट्रात रणकंदन माजलं होतं. कोकणात या प्रकल्पाला विरोध होत असल्याने शिवसेनेने त्यात उडी घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोकण दौऱ्यात हा प्रकल्प रद्द होणारच असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याच्या अटीवरच सेनेनं युतीसाठी होकार दिला. देशातल्या सर्वाधिक विदेशी गुंतवणूक होणाऱ्या प्रकल्पांपैकी नाणार हा एक प्रकल्प होता.
शिवसेना कधीही विकासाच्या विरोधात नाही. पर्यावरणाला पूरक असे गोव्यातील उद्योग येथे यावेत यासाठी शिवसेना प्रयत्न करेल, असं ते म्हणाले.नाणार प्रकल्पामुळे कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे नाणार प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून शिवसेनाही ग्रामस्थांसोबत आहे, असे नमूद करत विकास होत असताना कोकणचं वैभव मारलं जाणार नाही, याची खबरदारी आपण घ्यायला हवी, अशी अपेक्षा उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. यावेळी उद्धव यांनी ग्रामस्थांच्या असहमती पत्रांचा गठ्ठाच मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला
अधीसूचना रद्द करण्याच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे शिवसेना त्यांची आभारी असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, भाजपसोबत युती करताना नाणार प्रकल्प रद्द करा, अशी शिवसेनेची प्रमुख अट होती.

No comments:

Post a Comment