तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

गेवराई येथील तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेत यश मुळे द्वितीय


विशेष प्रतिनिधी..
----------------------
गेवराई, दि. ५ ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी शिवजन्म सोहळ्यात गेवराई तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत यश सुभाष मुळे याने सर्वद्वितीय येण्याचा बहुमान पटकावला. यश मुळे हा जयभवानी व जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गढी, गेवराई येथील शिवशारदा पब्लिक स्कूूूलचा विद्यार्थी आहे.
       खुल्या गटात शिवचरित्रातील प्रसंग व प्रतिके या विषयावर चित्रकला स्पर्धेत त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि पाण्यातील जंजिरा किल्ला हे चित्र हुबेहूब चितारले होते. रविवारी, दि. ३ मार्च २०१९ रोजी शारदा विद्या मंदिर येथे झालेल्या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडीत, शिवजयंती उत्सव समितीचे संयोजक तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश वक्ता सेलचे प्रदिपदादा सोळंके, राष्ट्रवादी पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती जगन पाटील काळे, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. इलियासभाई, भवानी बैंकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटेे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, माजी जि.प.सदस्य विजय घाडगे, जलिंदर आण्णा पिसाळ, माजी सभापती कुमारराव ढाकणे, राष्ट्रवादी किसान सेलचे सुनील पाटील आदी मान्यवर यांच्या हस्ते यश मुळे यास सन्मानित बक्षीस, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खुल्या गटासाठीचा पारितोषिकाचा मान पटकावणाऱ्या यश मुळे याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. याबद्दल आजी लक्ष्मीबाई मुळे, वडील श्री. सुभाष मुळे, आई सौ. शारदा मुळे, काका दिलिपराव मुळे, काकी लता मुळे, भाऊ रोहित मुळे, दिपक मुळे, बहीण किर्तिका मुळे यांनी आनंद व्यक्त केला तर गेवराईतील बहुसंख्य नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. येथील शिवशारदा पब्लिक स्कूूूलचे प्राचार्य दत्त निरंजन सर, अमृत डावकर सर, चित्रकला शिक्षक देशमुख सर, माधव चाटे, शेळके सर तसेच सर्व शिक्षक, सहकारी मित्र परिवार आणि आप्तेष्टांनी यश मुळे याचे कौतुक करून पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा दिल्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment