तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

जोगवाडा येथील देशी-विदेशी दारू विक्री वर पोलीस अधीक्षक परभणी यांच्या पथकाकडून धाडसी कारवाई...


 जिंतूर..

जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे दिनांक 16 रोजी दुपारी श्री.कृष्णाकांत उपाध्याय (पोलीस अधीक्षक परभणी) यांच्या पथकाने धाड टाकून देशी-विदेशी दारुचा मोठा साठा जप्त केला..
जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंद्यांचा धुमाकूळ माचला होता, ज्यामध्ये सर्वसामान्यांना या अवैध धंद्यापाई आपले कौटुंबिक जीवन जगणे हलाखीचे झाले होते.. गावातील चौकाचौकात या दारुड्यांनी धुमाकूळ लावला होता त्यामुळे गावातील महिला वर्गांना तसेच शाळकरी मुलांना ये-जा करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.. या गोष्टीची वारंवार स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार करून देखील कोणतीही कारवाई केली जात नव्हती शेवटी ग्रासलेल्या  सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या पथकाने धाडसी कारवाई केल्याचे निदर्शनास आले या गोष्टीमुळे सर्वसामान्य जनतेकडून मोठे समाधान व्यक्त होत आहे..

1)  या धाडीमध्ये 1500 रु.किमतीच्या ज्यामध्ये मॅगडाॅल नं.1  कंपनीच्या 180 ml..10 बॉटल...

२). 1440 रु.किमतीच्या मॅगडाॅल नं.1कंपणीच्या 90 ml...18 बाॉटल..

3). 420 रु.किंमतीच्या इम्पीरीयल ब्ल्यु कंपनी 180 ml...3 बाॅटल..

4) 1425 रु.किंमतीच्या इम्पीरीयल ब्ल्यु कंपनी..90 ml...19 बाॅटल..

5) 156 रु.किंमतीच्या भिंगरी संत्रा..180ml..3 बॉटल..

6) 130रु ज्यामध्ये भिंगरी संत्रा कंपनी..90 ml. 5 बाॅटल...व

7) 410 रु.ज्यामध्ये देशी विदेशी दारूची विक्री करून जमा झालेली नगदी..सदरची कारवाई मा. श्री. कृष्णकांत उपाध्याय पोलीस अधीक्षक साहेब परभणी, मा. श्री. विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.जी.पांचाळ, सखाराम तेकुळे, श्रीकांत घनसावंत,अतुल कांदे, तसेच पोलीस मुख्यालय परभणी येथील जगदीश रेड्डी, म.पो.कॉ. पूजा भोरगे, चालक दीपक मुंडे यांनी केली असून आरोपी लक्ष्मी प्रसाद माकोडे वय (50) यांच्यावर पोलीस स्टेशन चारठाणा येथे गुन्हा दाखल झाला आहे..

No comments:

Post a Comment