तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 March 2019

८ मार्च –आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई :दि.८ आज २१व्या शतकात महिलांनी बरीच मजल मारली आहे..आज प्रत्येक क्षेत्रात ती पाय रोवुन उभी आहे..स्त्री ने अनेक क्षेत्रात आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत ती अगदी लिलया सांभाळते.
ज्याला स्त्री ‘आई’ म्हणुन कळली तो जिजाऊचा “शिवबा” झाला…
ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणुन कळली तो मुक्ताईचा “द्यानदेव” झाला…
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणुन कळली तो राधेचा “श्याम” झाला…
आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा “राम” झाला
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो ८ मार्च रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला पुढे भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला.
१९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले.स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका,आणि विविध  कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.
आज अनेक क्षेत्रात महिलांनी पुरुषांचा खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्र पादाक्रांत केली आहेत .मग ती राजकीय , कला , क्रीडा सांस्क्रुतिक क्षेत्र असू . महिला सक्षम झाल्या आहेत .सुप्रिया सुळे , नीलम गोऱ्हे , पूनम महाजन , सुषमा स्वराज , निर्मला सीतारामन , भावना गवळी , उमा भारती , राबडीदेवी , ममता बेणेर्जी , जयललिता , यांनी आपले नाव राजकीय क्षेत्रात उल्खेणीय केले आहे.पी.टी उषा , मेरी कॉम, सानिया मिर्जा , सायना नेहवाल , डी पुरंदरेष्वरि , यांनी क्रीडा क्षेत्रात कामगिरी केली आहे.दीपिका पादूकोन, प्रियांका चोप्रा , माधुरी दीक्षित , करीना कपूर , ऐश्वर्या यांनी बॉलीवुड मध्ये आपले महत्व पूर्ण योगदान दिले आहे.लता मंगेशकर , उषा मंगेशकर , आशा भोसले , अलका यागनिक, चित्रा , वैशाली सामंत यांनी गायन क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे .इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या , प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्या , नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांनी शांतीचा संदेश दिला , किरण बेदी पहिल्या आई.पी.एस झाल्या , सिंधूताई सकपाळ हया अनाथाच्या आई झाल्या , सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडे केली , जिजाऊनी शिवबा घडविला अश्या नारी शक्तीला आमचा सलाम
 स्त्रिया ह्या ट्रेन, विमान यांबरोबरच ऑटो रिक्षा देखील सफलता पूर्वक चालवत आहेत. भारताच्या मुली सुनीता विलियम्स आणि कल्पना चावला अंतरीक्ष जगाच्या शान मानल्या जातात. प्रथम रेल्वे गाडी चालवणारी महिला सुरेखा यादव ह्या फक्त भारताची नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे महिला चालक आहे.आज महिला फेसबुक व अन्य सोशल नेटवर्किंग द्वारे आपल्या गोष्ठी सांगत आहेत. देशभरच्या बातम्या ची खबरबात ठेवत आजची महिला घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी योग्य प्रकारे सांभाळत आहे.
महिलांना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

No comments:

Post a Comment