तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

जिंतूरात संत श्री भगवान बाबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन


जिंतूर
तालुक्यातील शेवडी येथे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून या मंदिरामध्ये संत श्री भगवान बाबा व विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती प्राणप्रतिष्ठा 25 मार्च रोजी करण्यात येणार असून या निमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले आहे.

 यामध्ये दि 24 मार्च रोजी ह भ प सोपान महाराज सानप, दि 25 मार्च रोजी हभप बाळु महाराज गिरगावकर यांचे हरिकीर्तन तर दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ह भ प डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दिनांक 25 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता संत श्री भगवान बाबा,विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या तीन दिवसीय कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत श्री भगवान बाबा वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान, संत श्री भगवान बाबा युवक संघटना व समस्त समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a comment