तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

अभिनव विद्यालय व संस्कार प्राथमिक शाळा परळी वैजनाथ यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-

ज्ञानप्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय व पद्मावती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्कार प्राथमिक शाळा परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमानाने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या वैजनाथ ज्योतिर्लिंग येथे महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अभिनव विद्यालयाचे संस्थापक सचिव परळी भूषण माननीय साहेबराव फड साहेब व संस्कार शाळेचे सचिव माननीय दीपक तांदळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून दिनांक 5 मार्च 2019 मंगळवार रोजी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादात शुद्ध पाणी ,पुरी भाजी व खिचडी या पदार्थांचे वाटप करण्यात आले .यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादचा लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभिनव विद्यालयाचे कार्यवाहक श्री सूर्यकांत कातकडे सर, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्कार प्राथमिक शाळे चे  मुख्याध्यापक व सर्व शिक्षक  यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment