तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 March 2019

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महाडळाच्या योजनेतील मराठा तरुणांना कर्ज वाटप करण्यास खोडा


शहरातील येलदरी रोड वरील एस बि आई शाखेतील प्रकार 
प्रतिनीधी जिंतूर
मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या वतीने कर्ज वाटप करण्याचे सर्व बँकांना आदेश राज्य शासनाने दिले होते मात्र शहरातील येलदरी रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करत असून आज पर्यंत एकही कर्ज प्रकरण मंजूर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र येत्या मार्च एन्ड पर्यंत मराठा समाजातील तरुणांना कर्ज वाटप केले नाही तर मराठा समाज आंदोलन करण्याचा पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात क्रांती मोर्च्याचा माध्यमातून मराठा समाजाचा विविध मागण्यांसाठी वेगवेगळी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते यावेळी राज्य सरकारचा वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा कडून मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लक्ष रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते तसेच वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांच्या राज्य व जिल्हा स्तरावर बैठका घेऊन आदेश पण दिले होते तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी रीतसर अर्ज करून  विविध बँकेत कर्ज प्रकरने दाखल केली आहेत परंतु शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया यलदरी रोड शाखा अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली नाही मागील पाच ते सहा महिन्यांपासून लाभार्थी दरवेळी बँकांकडे चकरा मारत आहेत मात्र रोज काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करून खोडा घालण्याचे काम होत आहे.म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन मराठा समाजातील तरुणांना कर्ज वाटप करावे अशी मागणी मराठा तरुण करत आहेत.

चौकट,
बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवणार
मागील दोन वर्षापासून समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहेत त्यातच काही तरुणांनी आपल्या जीवाचे बलीदान दिलेले आहे म्हणून मोठ्या संघर्षा नंतर समाजाला थोड्या प्रमाणात काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा होती यात तरुणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज देण्याचे घोषीत केले मात्र शहरातील यलदरी रोड वरील बँककडे अनेक प्रकरण दाखल आहेत परंतु अद्याप पर्यंत एकही कर्ज प्रकरण मंजूर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे परिणामी बँक अधिकारी मुजोरीत वागत आहेत म्हणून असल्या बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम संभाजी ब्रिगेड करेल.
--बाळासाहेब काजळे 
तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड सामाजीक

चौकट,
प्रकरणात कार्यवाही चालू आहे

आमच्या शाखेकडे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे चार ते पाच कर्ज प्रकरणे दाखल आहेत या प्रकरणात कार्यवाही चालू आहे 
-- विनोद साखरे कर्ज विभाग स्टेट बँक ऑफ इंडिया

No comments:

Post a Comment