तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीचा संशय बळावतोय..!सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. १९ __ शहरात असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला लागलेल्या आगीतला संशयाचा धूर थांबायला तयार नाही. दाल में कुछ काला है क्या ? असा नेमका प्रश्न शहरातील नागरिकांनी गोदाम जळीत प्रकरणाच्या निमित्ताने उपस्थित केला आहे.
      शहराच्या दक्षिण दिशेला राष्ट्रीय महामार्गावर राज्य सरकारच्या वखार महामंडळाच्या गोदामाला रविवार दि. १० मार्च २०१९ रोजी मध्यरात्री आग लागून जवळपास 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या वखार महामंडळाचे एकाच ठिकाणी चार गोदाम आहेत. यापैकी सर्वात शेवटी असलेल्या चौथ्या क्रमांकाच्या गोदामाला आग लागली होती. आगीमध्ये कापसाच्या गठाण व धान्याची पोती जळून खाक झाली आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास १५ तास लागले, यावरून आगीचे तांडव लक्षात येईल. आगीचे कारण समजू शकले नाही, मात्र घटनेविषयी उलट सुलट चर्चा आहे. विशेष म्हणजे, आगीत भस्मसात झालेल्या गोडाऊन मध्ये विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित नव्हती, मग आग कशाने लागली. याचा उलगडा होत नाही. आग नेमकी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी लागल्याने आगीचे गुढ वाढले आहे. शनिवारी व रविवार असे दोन दिवस सुट्टी होती. त्यामुळे रविवारी लागलेली आग संशय निर्माण करायला जागा असल्याने चर्चा आहे. खर म्हणजे मोदी सरकारच्या ऑनलाईन धोरणामुळे काळे धंदे करणारे अडचणीत आलेत. यापुर्वी कापसाच्या व्यावसायिकांनी सरकारचा खिसा रिकामा केलेला आहे. याच्या अनेक कथा आजही सांगितल्या जातात. या बाबतीत मनजीत जिनिंग यांच्या नावाची चर्चा आहे. येथील व्यवस्थापनाने महाराष्ट्रासह दोन तीन राज्यात स्वतःच्या  मालकीच्या जिनिंग मधील गठाण जळीत कांडाची प्रकरणे उघडकीस आली होती. मात्र वरपर्यंत साखळी असल्याने मनजीत जिनींगच्या संचालकांवर कोणतीच कारवाई झाली नाही. मोठ मोठे व्यावसायिक सरकारी खिसा मारायला सोपा उपाय म्हणून अशा घटना घडवून आणत होते. मागे एक चोरीचे प्रकरण व त्यातला चोरटा पोलिसांनी जेरबंद केला होता. त्यानंतर त्याने पोलिसांना सांगितलेला किस्सा विचार करायला लावणारा होता. तो अस म्हणाला की, मी कोणत्याही घरी चोरी करत नाही. फक्त जिल्हा सरकारी बॅन्केत चोरी करतो. सरकारी माल असतो, दोन दिवस चर्चा होते, नंतर लोक विसरतात.
         गेवराई च्या गोदामाचे काय होते ते आता पहावयाचे आहे. येथील आग दोन दिवस धुमसत होती. लागलेल्या आगीत एकूण १५ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस अधिकारी व वखार मंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले, त्यांच्या अनुभवातून काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. गोदामात वजन करून माल ठेवला जातो. नियमानुसार भाडे आकारले जाते. गोदामात माल ठेवताना, वजनाच्या पावत्या पाहून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर या ठिकाणी कार्यरत असलेल्या हमाल सुरक्षितपणे माल उतरून घेतात. आता प्रश्न असा आहे की, सर्वात जास्त नुकसान कापसाच्या गठाणीचे झाले आहे. सध्या गठाणीचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजार तेजीत आहे. गठाणीचा कापुस वीस रूपये किलो असून, एक गठाणाची किंमत लाखापेक्षा अधिक गेली आहे. आगीत भस्मसात झालेल्या गोडाऊन मध्ये सी.सी.आय. शासकीय कापुस खरदीच्या २ कोटी ,९० लाख रुपयांच्या कापसाच्या गठानी होत्या. खाजगी जिनींगच्या मालकीच्या १० कोटी ४२ लाख रुपयांच्या ५१०० शे. गठाणी ठेवण्यात आल्या होत्या. नाफेडची खरेदी केलेली १ कोटी, एक लाख रुपयांची तुरीची पोती, शेतकऱ्यांच्या १ लाख ८९ हजाराची तुरीची पोती आगीत जळून खाक झाली. गोडाऊनचे दीड कोटी रुपयांचे झाले आहे. एकुण १५ कोटी, ९० लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी राजेंद्र भीसे यांनी दिली आहे.
     आता या कापसाच्या गाठी व धान्याची पोती कुणाची होती. यावरून ही वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. घटनेविषयी उलट सुलट चर्चा आहे. विशेष म्हणजे, आग लागलेल्या गोडाऊन मध्ये विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे आगीचे गुढ वाढले आहे. तपास अधिकारी म्हणून भुषण सोनार काम करत आहेत. या प्रकरणातले सत्य बाहेर काढण्याचे काम त्यांना करावे लागेल. पोलीस व तपास यंत्रणा कार्यरत झाली आहे. सध्या तरी, दाल मे कुछ काला है क्या..? असा नेमका प्रश्न विचारला जात आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment