तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 March 2019

सार्वजनिक ईमारत, रस्ता तसेच रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही असे आदेश लागू


परभणी, दि.15:- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.10.03.2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचारसंहीता अंमलात आलेली आहे. परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनीधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डींग्ज, कमाणी लावणे या व ईतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध लादण्‍यात आल्‍याचे आदेश जिल्‍ह्यात लागू करण्‍यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीचे साहीत्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23/05/2019 पर्यंत) निर्बंध घालण्‍यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे आदेश एकतर्फी ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही जिल्‍हादंडाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment