तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 March 2019

बोरगव्हान शाळेची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड;गावकऱ्यांनी जल्लोशात केले स्वागत;आंतरराष्ट्रीय दर्जा मिणाळणारी तालुक्यातली दुसरी शाळा

प्रतिनिधी
पाथरी:-प्राथमिक शाळा बोरगाव येथे  जागतिक महिला दिनाच्या दिवसी प्राथमिक शाळा बोरगाव आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवडीचे पत्र प्राप्त झाले. त्या निमित्त गावकऱ्यांनी गावात बँड लावून लेझीम पथका सह मिरवणूक काढण्यात आली. बोरगव्हाण ही शाळा आता तालुक्यातील दुसरी आंतरराष्ट्रीय शाळा ठरली असून या पुर्वी माळीवाडा शाळेला हा दर्जा या पुर्वीच प्राप्त झाला आहे.
 २०१९-२०या शैक्षणिक वर्षा साठी पहिल्या टप्या मध्ये महाराष्ट्र  आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची अस्थाई संलग्नता मिळ्याने गावातील मुलांना व गावकऱ्यांना  पालकांना आनंद झाला घरोघरी, दारोदारी, सर्व शिक्षकांचे आरती करून अौक्षण केले. तसेच गावांमध्ये सणाचे व आनंदाचे वातावरण दिसून येत होतं. ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची होण्या साठी गेल्या तीन वर्षात लोकवर्गणीतून सभामंडप, बॅड काँक्रेट ,मुलींसाठी स्वच्छता गृह ,मुलां साठी स्वच्छता गृह ,शालेय पोषण गँस भट्टा, संगणक लॅब वाचनालय उत्कृष्ट, प्रयोगशाळा, दोन एकर  ग्राउंड साठी जमीन ,आदर्श आॅफिस, सर्व वर्ग इ-लर्निंग या सर्व गोष्टी लोकवर्गणीतून करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची झाली आहे .वर्षभरात विद्यार्थ्याकडून शंभर ते दीडशे परीक्षा घेतल्या जातात यावर्षी एमटीएस, श्रेया, बी डी एस, एमपीसी, स्कॉलरशिपं, नवोदय, आरटीएस परीक्षेला बसलेले आहेत पथक प्रमुख सागर, याच्या अथक प्रयत्ना नंतर ही शाळा आंतरराष्ट्रीय झाली. सभापती सौ ढगे, उपसभापती रमेश तांगडे, डुकरे यानी गावात येऊन सर्व शिक्षक व समितीचा सत्कार केला. पालक चंद्रकांत नाईक सुमन नाईक यांनी शाळेत येऊन सत्कार केला,  याचे श्रेय इंटरनॅशनल विद्यार्थी, पालक शालेय व्यवस्थापण समीती सदस्य मुख्याध्यापक बजरंग गिलडा, तायनाक सुधाकर, खरवडे मीरा, निपाणीकर ज्ञानेश्वर, रोंगे नरसिंग, देवडे शिवलिंग, खिल्लारे विजय, बोंदर सुमन, पालदेवार सारिका, साबळे सरीता शेळके सखाराम, चव्हाण विलास, धनले सुनील याचे अभिनंदन  मुख्य कार्यकारीधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटविकासधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तारधिकारी, केंद्रप्रमुख जि प सदस्य मीरा दादासाहेब टेंगसें पं स सदस्या सौ कल्पनाताई सदाशिव थोरात,पोलीस पाटील, सरपंच,उपसरंपच व गावकरी, अध्यक्ष व उपाध्यक्ष सदस्यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment