तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची व्यथा का दिसत नाही ?- धनंजय मुंडे

बजरंगबप्पांच्या प्रचारार्थ एकाच दिवसात 13 गावांचा मॅरेथॉन दौरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.30....... बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्यात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या होम ग्राऊंड परळी मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मोठ्या सभांऐवजी मतदारांशी त्यांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आवाहन करण्यावर त्यांनी भर दिला असून, याच अभियानांतर्गत काल शुक्रवारी त्यांनी तब्बल 13 गावांचा मॅरेथॉन दौरा केला.

सकाळी 8 वाजल्यापासून कौठळी येथुन आपल्या दौर्‍याची सुरूवात करताना बेलंबा, लोणारवाडी, सेलू, लोणी, दा.वडगाव, दगडवाडी, धारावती, वैजवाडी, मिरवट, कासारवाडी, नंदनज अशा बारा गावांचा दौरा करून सायंकाळी सारडगाव येथे जाहीर सभेला संबोधित केले.

स्व.मुंडे साहेबांच्या निधनानंतरच्या निवडणुकीत जनतेने भरभरून मुंडे भगिनींना प्रेम दिले असतानाही जिल्ह्याच्या उपेक्षा का ? असा प्रश्न त्यांनी केला. डोळ्यात पाणी आणि भावनिक करून जनतेचे प्रश्न सुटत नसतात, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री समजण्यापेक्षा, सामान्य माणसाच्या व्यथा त्यांच्या प्रतिनिधी म्हणुन समजल्या पाहीजेत, तोच खरा लोकप्रतिनिधी असतो, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. तुमच्या मोठ्या पणाचा जनतेला काय उपयोग? लातूरहून मुंबईला जाणारी रेल्वे परळीत का थांबवता आली नाही ? लातूरचा रेल्वे डब्यांचा कारखाना परळीत का आणता आला नाही ? वारसा हक्काने मिळालेल्या संस्था कर्जाच्या खाईत गेल्या, ऊस वाळत असताना ऊसात राजकारण केले, ज्यांचा ऊस गेला त्यांचे पेमेंटही दिले नाही, अशांना आता मतदान का करायचे- असा सवाल त्यांनी केला. 

यावेळी या दौर्‍यात त्यांच्या समवेत जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव, पं.स.सदस्य सटवाजी फड, संजय आघाव, सरपंच वसंतराव आघाव, उपसरपंच माऊली मुंडे, विकास बिडगर, बंडु गुट्टे आदींसह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a comment