तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

पाथरीत इव्हिएम व्हिव्हिपॅट प्रशिक्षणास प्रतिसाद


प्रतिनिधी
पाथरी:-,येथील तहसिल कार्यालयात मतदान अधिकारी, कर्मचारी यांना इव्हीएम मशिन सोबत व्हिव्हीपॅट उपलब्ध करून दिली असून हे मशीन हाताळण्याचे प्रात्यक्षिक दिले जात असल्याची माहिती उपविभागिय अधिकारी तथा सहायक निवडणुक अधिकारी व्हि एल कोळी यांनी दिली.
यावर्षीच्या निवडणुकीत प्रथमच व्हिव्हीपॅट चा उपयोग होत असून मतदारांना त्यांनी केलेले मतदान या मशिनवर पाहाता येणार आहे.तसेच मतदान झाले की नाही याची खात्री करता येणार आहे.व्हिव्हीपॅटचा वापर प्रथमच लोकसभा निवडणुकीत होत असल्याने या बाबतच्या प्रशिक्षणास प्राधान्य दिले जात आहे.या प्रशिक्षणात ही मशीन सील करणे, जोडणे, मशीन योग्य प्रकारे हाताळणे इत्यादींचा सामावेश आहे. तसेच हे प्रशिक्षण दि २४मार्च रोजी औद्येगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)  मध्ये ही देण्यात आले होते. या नंतर २५ मार्च पासून १५ एप्रिल पर्यंत तहसिल कार्यालयात हे प्रशिक्षण सुरू असून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.मतदान अधिकारी,कर्मचारी इव्हिएम व व्हिव्हीपॅटचे प्रशिक्षण स्वयंस्फुर्तीने घेत आहेत हे प्रशिक्षण सहायक निवडणुक निर्णय अधिकारी व्हि एल कोळी, पाथरीच्या तहसिलदार भाग्यश्री देशमुख, मानवत चे तहसिलदार डि डि फुपाटे, सोनपेठचे तहसिलदार आशिषकुमार बिरादार यांच्या निर्देशानुसार मास्टर ट्रेनर सोनवळकर यांच्या मार्गदर्शना खाली माणिक घाटूळ, संजय पवार, संजय चिंचाने, वसंत वांगिकर,विलास मिटकरी, तुपसागर हे प्रशिक्षण देत आहेत

No comments:

Post a comment