तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

घरगुती सिलिंडर महागला महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी 
मुंबई : मुंबई 
सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे, कारण तीन महिन्यानंतर घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. अनुदानित सिलिंडर दोन रुपये आठ पैशांनी महागलं आहे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ४२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात येणार आहेत. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि विमानाच्या इंधनाच्या दरांचा आढावा घेतातकरात वाढ झाल्यानं हे दर वाढवल्याचं तेल कंपन्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडर ४९५ रुपये ६१ पैशांना मिळणार आहेत तर विनाअनुदानित सिलेंडर ७०१ रुपये ५० पैशांना मिळेल.गेल्या दोन महिन्यात सिलिंडरच्या दरांमध्ये २८३ रूपये कपात झाली होती. आज नवे दर लागू करण्यात आलेआहेत. नव्या दरांनुसार, मुंबईमध्ये अनुदानित सिलिंडरची किंमत ४९३.३२ रूपये झाली आहे. तर कोलकातामध्ये ४९८.७५ रूपये आणि चेन्नईमध्ये ४८३.४९ रूपये झाला आहे. विनाअनुदानित सिलिंडर मुंबईमध्ये ६७३.५० रूपये किंमतीत मिळणार आहे. तर कोलकातामध्ये ७२७.५० रूपये आणि चेन्नईमध्ये ७१७ रूपांना मिळेल.

No comments:

Post a Comment