तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 March 2019

आदर्श आचारसंहितेचा भंग करणारांची गय केली जाणार नाही-वसंत परदेशी
फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)

मंगरूळपीर-येथील पंचायत समिती सभागृहात दि.२० मार्च रोजी आगामी ग्रा.पं.निवडणुक तसेच येणार्‍या सण ऊत्सवानिमित्य शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन वाशिम जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत करन्यात आले होते.
      होवु घातलेल्या निवडणुकी आणी येणार्‍या सण ऊत्सवाच्या पार्श्वभुमीवर मंगरुळपीर येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समितिच्या बैठकीचे आयोजन करन्यात आले होते.सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन तालुक्यात शांतता आणी सुव्यवस्था राखन्यासाठी पोलिस प्रशासनास मदत करावी.चांगल्या कामासाठी पोलिस आपल्या सदैव पाठीशी आहेत.विनाचौकशी गुन्हे दाखल करुन एखाद्या चांगल्या व्यक्तीला कायद्यात नाहक अडकवणे हे चुकीचे आहे.पोलिसांनीही विनाचौकशी गुन्हा दाखल करुन कुणाला ञास देणे बंद करावे.आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे,कुणी आचारसंहितेचा भंग केल्यास गय केली जाणार नाही तसेच कायदा हा आपल्या हितासाठीच आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहुनच काम करावे व सामान्य लोक चांगलेच असतात पण काही वाईट प्रवृत्तिचे लोक वातावरण बिघडवतात अशा लोकांना पोलिस वठणीवर आनतील यात शंका नाही असे मत वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी व्यक्त केले.या शांतता समितिच्या बैठकीला मंगरुळपीरचे तहसिलदार किशोर बागडे,एसडिपिओ नंदा पाराजे,ठाणेदार इंगळे साहेब यांचेसह तालुक्यातील पोलिस पाटील,सामाजिक कार्यकर्ते,शांतता समितिचे पदाधिकारि यांचेसह पञकार बांधवाची ऊपस्थिती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment