तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

दिवसा ढवळ्या घर फोडीने भितीचे वातावरण


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठः शहरातील सारडा कॉलनी येथील खाजगी शाळेतील शिक्षकाच्या घरी 5 मार्च मंगळवार रोजी दुपारी घरामध्ये कोणीही नसताना घरातील सोन्याच्या दागीन्यासह 3 लाख 38 हजाराचा मुद्देमाल चोरला म्हणून अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 शहरातीलच खाजगी व्हिजन पब्लिक स्कुल येथे विजय चव्हाण व सुनिता चव्हाण हे पतीपत्नी दोघे शिक्षक असून दोघेही मंगळवार पाच मार्च रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता शाळेत गेले होते त्यानंतर त्यांनी चार वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा तोडलेला दिसला तसेच बेडरूममध्ये पाहणी केली आसता बेडरूम मधिल शोकेस मधिल 11 तोळे सोन्यासह रोख पाच हजार रूपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेला म्हणून विजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार संतोष मुपडे हे करत आहेत

No comments:

Post a Comment