तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

संत विचारानेच शाश्वत सुख मिळते -ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे

पुणे  (प्रतिनिधी) :- संतांच्या विचार अंगीकृत केल्यास मानवी जीवन स्थिर होऊन शाश्वत सुख संत विचारानेच मिळते असे प्रतिपादन ह.भ.प.ॲड.दत्ता महाराज आंधळे यांनी केले.
         पिंपरी ता.मावळ जि.पुणे येथिल वर्र्सुबाई माता मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनसेवा करताना ,"काय सांगो आता संतांचे उपकार/मज निरंतर जागविती//"या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करताना साहित्यिक तथा संतवाङमयाचे संशोधक असलेले  ह.भ.प.दत्ता महाराज म्हणाले की,संतांचे जीवावर,समाजावर आणि अखिल विश्वावर अनंत उपकार आहेत .संत हे मानवी जीवाला निरतंर जागविती  ,शिकविती व सांभाळीती म्हणून त्यांचे ऋण या जगावर आहे .संत वाङमयातून संतांनी मानव कल्याण  व शाश्वत सुखाचा ,चिरंतन सुखाचा मार्ग सांगितलेला आहे .
यावेळी माळेगाव  पंचक्रोशीतील भजनीमंडळ तसेच ह.भ.प.गजानन गोरे महाराज ,ह.भ.प.मनोहर भालके, ह.भ.प.शंकरराव सुपे,मृदंगाचार्य ह.भ.प रविंद्र मोरमारे,सरपंच राजेशजी कोकाटे,धडाडीचे कार्येकर्ते व आदर्श सरपंच  श्री बाळासाहेब खंडागळे आणि श्री बाळासाहेब घाडगे,ठाकर व ह.भ.प.प्रमिलाताई भालके तसेच असंख्य भाविक   उपस्थित होते .

No comments:

Post a Comment