तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार

पद्मावती गल्लीसह शहराच्या विविध भागात प्रचार फेरी, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ३१... 
    खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर परळीकरांची मान उंचावेल असे काम केले आहे त्यामुळे यावेळी परळी शहरातुन मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्य देणार असल्याचा शब्द मतदारांनी दिला. पद्मावती गल्ली आणि शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेर्‍यांना भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जाऊन डॉ. प्रितमताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. 
      आज रविवारी सकाळी शहराच्या पद्मावती गल्लीमध्ये भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रूक्मीणींची पुजा करण्यात आली. श्रीफळ वाढवून फेरीला सुरुवात करण्यात आली. ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, येऊन येऊन येणार कोण, प्रितमताईंशिवाय दुसरे कोण अशी जोरदार घोषणाबाजी करीत घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी प्रचार केला. या फेरीत भाजपा जेष्ठ नेते दत्तापा ईटके, डाॅ. हरीश्चंद्र वंगे,  शांतीलाल जैन, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, चंद्रकांत समशेट्टे, अरुण टाक, चैनसुख जाजु, विठ्ठलअप्पा चौधरी, वैजनाथ ताटीपामल, डाॅ. शालीनीताई कराड, डाॅ. दे.घ.मुंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊराव भोयटे, गुलाबअप्पा शेटे, अशोक भातांब्रेकर, विजयसेठ वाकेकर, प्रकाश जोशी, रमेश भोयटे, बंडुसेठ टाक, अतुल दुबे, रमेश चौंडे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, राजेंद्र ओझा, अॅड. मिर्झा अली, राहुल टाक,  राहुल केंद्रे, पि.टी. मुंडे, सुनिल चिकाटे, नरेश पिंपळे, धनराज कुरील, बाळु शहाने, मोहन जोशी, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, सचीन गित्ते, प्रितेष तोतला, अनिष अग्रवाल, अमोल डुबे, श्रीनिवास राऊत, राजेश ताटीपामल, रवि टाक, प्रमोद दहिवाळ, निलेश राका, विजयकुमार खोसे, अश्विन मोगरकर, सुनिल कांबळे, सय्यद शेरु, बंडुनाना कोरे, संजय देवकर, सोमनाथ वाघमारे, सचिन गिराम, संतोष हाळणे, रोहन क्षिरसागर, गणेश कराड, दत्ता सोळुंके, प्रवीण सत्ताळे, सोमनाथ खोसे, बाळू कुरे, उत्तरेश्वर बहिरे,भगवत मोरे, नाना कदम, सुदीप गोपणपाले, सचिन झिरपे, राम शिंदे, संतोष सोनवणे, करण कदम, वेंकेटेश कुंभार, ऋषी बिडगर,दिनेश अंधारे, माऊली मोरे, हनुमान राऊत, यश बिडगर, श्रीनाथ राऊत, नितीन गिराम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
   
माणिकनगर, जिव्हेश्वर नगरमध्ये रॅली

    भारतीय जनता पार्टी ,शिवसेना,रिपाई,रासप रयत     क्रांती सेनेच्या बीड़ लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ  माणिकनगर, जिव्हेश्वर नगरमध्ये हनुमान मंदिर येथे  श्रीफळ वाढवून आज सकाळी 8 वा  गाठी भेटी घेऊन मतदारांनशी सवांद साधला. यावेळी नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख राजभाऊ दहिवाळ, विठ्ठल दंदे, नगरसेवक प्रा,पवन मुंडे, सुशीलाताई फड, शिवसेना उपशहर प्रमुख अभिजित धाकपडे, शिवसेना युवा तालुका प्रमुख अमर टाकळकर,भाजपा युवा नेते योगेश पांडकर, भाजपा सोशल मिडीया सेलचे विजयकुमार खोसे, वैजनाथ रेकणे, विजय दहिवाळ, सुधाकर खोकले, विकास गायकवाड, राहुल फड, शिवा दंदे,पंकज मुंडे, रमेश मुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment