तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

परळीत वीज वितरण कार्यालयाच्या बैठकीत स्थानिक अभियंते, कर्मचारी यांना मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंत्यांनी घेतले फैलावर


वीज बिल वसुली व दुरुस्तीच्या कामांवर तीव्र नाराजी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.19
    येथील वीज वितरण कार्यालयाकडुन वेळेवर ग्राहकांकडुन वीजेची वसुली होत नाही. ग्राहकांच्या वीज दुरुस्तीच्या तक्रारी त्वरीत निकाली काढल्या जात नाहीत. वीज बिल चुकीचे दिले जात असल्याने वीज ग्राहकांत असंतोष वाढला आहे. परळी तालुक्यातील वीज चोरी रोखण्यात अपयश आले आहे. यासह अनेक प्रश्‍नांवर वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कांबळे, अधिक्षीक अभियंता, संजय सरग यांच्या उपस्थितीत परळीच्या वीज वितरण कार्यालयात दि.18 मार्च रोजी बैठक झाली. याबैठकीत असमाधान कारक कामाबद्दल स्थानिक अधिकारी व कर्मचार्‍यांविषयी नाराजी व्यक्त करुन वरिष्ठ अधिकार्‍यांनी खडेबोल सुनावले.
    परळी वीज वितरणच्या उपविभाग कार्यालयाची वीज ग्राहकांकडे तालुक्यात 22 कोटीची वीज बिले थकली आहेत. ही थकबाकी मार्च महिना जवळ आला तरी कमी झाली नाही. त्यामुळे मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंत्यांनी स्थानिकच्या वीज वितरण अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. वीज बिल वाटप करणार्‍या एजन्सीकडुन अनेक वीज ग्राहकांना वीज बिले वेळेवर दिले जात नाहीत. दिले तर बिले चुकीचे दिले जात आहेत. चुकीचे देऊनही वीज ग्राहकांना दुरुस्त करुन वीज बिले दिले जात नाहीत. अशा वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारीरी विषयीही बीडच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी परळीतील वसुली आढावा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे अनेक कर्मचार्‍यांनी दांडी मारली होती. वीजेची वसुली वाढल्यासच साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरु केलेल्या डी.पी.योजनेचा महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे गोंधळ उडाला आहे. या बैठकीस सहाय्यक व्यवस्थापक नामदेव पवार, उपमुख्य औद्योगिक संबधीत अधिकारी बागुल, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन थिटे इतर अधिकारी उपस्थित होते. अधिक्षक अभियंता संजय सरग म्हणाले की, वीज वितरण कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी सतर्कतेने काम करुन वीज बिल वसुली वाढवावी व वीजेच्या बिलाची दुरुस्ती वेळेत करुन देण्यात यावी.

No comments:

Post a Comment