तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 March 2019

प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्षपदी प्रमोद कराड यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान च्या महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्षपदी धडाडीचे कार्यकर्ते प्रमोद कराड यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
  प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानचे युवा राष्ट्रीय महामंत्री अंकित संचेती,राष्ट्रीय युवा अध्यक्ष भरत कात्यायान यांनी मार्गदर्शक शाम जाजु,यशको श्रीपाद नायक,खा.डॉ.डी.पी.वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड केली असुन परळी तालुक्यातील इंजेगाव येथील प्रमोद कराड यांनी विद्यार्थीदशेपासूनच सामाजीक कार्यास सुरूवात केली आहे.आत्तापर्यंत कराड यांनी अ.भा.विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री,कोकण प्रदेशमंत्री म्हणुन उत्कृष्ट कार्य केले आहे.कोकण विभागात अ.भा.विद्यार्थी परिषदेचे जाळे निर्माण केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली असुन संघटनेचे ध्येय धोरणे राबविण्यासाठी आपण सदैव तत्पर रहावे असे याबाबत दिलेल्या निवडपत्रात नमुद केलेले आहे प्रमोद कराड यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment