तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 March 2019

"माझी निवडणुुक माझा उमेदवार" चा नारा देत विटेकरां साठी लोकवर्गणी;कासापुरी ग्रामस्थांचा पुढाकार


प्रतिनिधी
पाथरी:-कोणतीही निडणूक म्हणलं की हौसे,नौसे, गवसे असलेल्यांची पर्वणी असते असे माणले जाते.हल्ली निवडणून म्हटलं की बेसूमार खर्च आलाच.उमेदवार ही प्रत्येकाची मागणी पुर्ण करण्या साठी प्रयत्न करत असतो. अर्थात असा खर्च उमेदवाराला निवडणुक आयोगाने ठरऊन दिलेल्या खर्चात सामावेश होत नाही.तो भाग वेगळा पण व्यक्तीगत महत्वाकांक्षा ठेऊन असना-यांची  ही मने राखण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवारा कडून होतांना दिसतो. या वेळी निवडणूकीची रनधूमाळी सुरू झाली असून 'ओट  भी देंगे और नोट भी देंगे"  "माझी निवडणुक माझा उमेदवार" म्हणत राजेश दादा विटेकरां साठी तालुक्यातील कासापुरी सर्कल मधील अनेक गावां मधून अर्थीक मदत गोळा करून दिली जाणार असून त्या साठी कासापूरी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करण्यास सुरूवात केली आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात गेली तीस वर्षा पासून शिवसेना उमेदवार सातत्याने निवडून आला आहे. पण या तीस वर्षात जिल्ह्यात विकास झाला नाही असे विरोधक सातत्याने सांगत आले आहेत. प्रमुख विरोधक असलेल्या  राकाँ ने तर चक्क "खासदार बदला जिल्हा बदलेल"  अशा काही नामांकीत वर्तमान पत्रात जाहीरातीच प्रसिद्ध केल्या होत्या त्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणात झाली. अशा परीस्थितीत या वेळी जिंकायचंच अशा निर्धाराने राकाँ कडून प्रयत्न सुरू असून पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहिर केलेली नसतांना  ही राकाँ कडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर यांचा जोरदार प्रचार सुरू झाला असून विषेशत:  सोशल मिडीयात जोरदार पोस्टरबाजी करत हा प्रचार होतांना दिसत आहे. मागिल अनेक महिण्यां पासून युवा वर्ग राजेश विटेकरांचा प्रचार करत आहे. तालुक्यात राकाँची पदाधिकारी बांधनी मजबुत झालेलेली दिसून येते. त्या मुळे प्रत्येक पदाधिकारी स्वत:ची  निवडणुक म्हणून कामाला लागले आहेत. या साठी पोस्टर ही तयार करण्यात आले असून सोशल मिडीयात या विविध पोस्टरची धूम सुरू आहे. विटेकर हे लोकसभे साठी नवा चेहरा असून युवा असल्याने या वेळी तुल्यबळ लढत होऊन विटेकर विजयी होतील असा विश्वास राकाँ पक्षा कडून व्यक्त होत आहे.लोकसभेची निवडणुक असल्याने या साठी मोठा खर्च ही लागणार आहे. आणि राजेश विटेकर हे पैशात कमी पडतील सर्वांची मने त्यांना राखता येणार नाहीत अशी चर्चा ही होत असतांना "नोट भी देंगे और ओट भी देंगे" म्हणत सेलू तालुक्यातील कुंडी येथील ग्रामस्थांनी विटेकरांना लोकसभा निवडणुकी साठी अर्थीक मदत दिल्या नंतर आता पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कल मधील काही गावां मधून विटेकरांना लोकवर्गणी करून अर्थीक मदत करण्या साठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून कासापुरी या गावात रस्त्याने फिरत निधी गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. त्या मुळे या वेळी प्रथमच अशा प्रकारे एखाद्या  उमेदवाराला परभणी लोकसभे साठी निधी जमा करून देण्यात येत असल्याने हा विषय गावकुसा सह सर्वत्र चर्चीला जात आहे.पाथरी तालुक्यात आघाडीच्या उमेदवारा साठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एक दिलाने काम करणार असल्याचे चित्र सद्य स्थितित पहावयास मिळत असून राजेश विटेकरां साठी ही जमेची बाजू आहे.

No comments:

Post a Comment