तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

सम्रग शिक्षा अंतर्गत अकोला जिल्हातील प्रथम इंटर्नशिप पुर्ण करणाऱ्या विद्यार्थाचा कौतुक सोहळाविशाल नांदोकार
अडगाव: सम्रग शिक्षा अंतर्गत अकोला जिल्हातील प्रथम इंटर्नशिप पुर्ण करणाऱ्या विद्यार्थाचा कौतुक सोहळा
जि.प विदयालय व कनिष्ठ महाविदयालय अडगाव बु॥ ता तेल्हारा जि अकोला येथे दिनांक १५ मार्च २०१९ रोजी शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक श्री रवींद्र जाधव आणि मुख्याध्यापक श्री................... पाटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली
जि प म गांधी विदयालय हिवरखेड ता.तेल्हारा,जि प विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय , आडगाव बु ता.तेल्हारा 
जि अकोला , विद्यांता स्किल कंपनी आणि इम्पोवेर प्रगती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
कार्यक्रमाची सुरवात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व द्वीपप्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रम अध्यक्षस्थानी वरिष्ठ शिक्षक श्री इंगळे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ .......... चव्हाण, शाळा समिती अध्यक्ष श्री........... वानखेडे लेंड-अ-हॅण्ड इंडिया/समग्र शिक्षा जिल्हा समन्वयक श्री विक्रम शिंदे आणि विद्यांता स्किल कंपनी समन्वयक श्री अमित नाटेकर उपस्थतीत होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  यानंतर  वैद्यकीय अधिकारी आणि प्रोप्राटर यांना शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व आभारपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रम बिंदू म्हणजे जिल्ह्यातील प्रथम इंटर्नशिप पुर्ण करणाऱ्या 43 विद्यार्थाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले यावेळी विक्रम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यात समग्र शिक्षा अंतर्गत नगर परिषद, जिल्हा परिषद आणि शासकीय आश्रम शाळा अश्या एकूण 11 शाळांना व्यवसाय शिक्षणा साठी सण 2014-15 पासून मान्यता मिळाली आहे यात मल्टी स्किल हेल्थ केअर , रिटेल , ऑटोमोबाईल, ब्युटी अँड वेलनेस इत्यादी अभ्यासक्रम शिकविले जात आहेत.याअभ्यासक्रमातील जिल्ह्यातील11 शाळांपैकी फक्त दोनच शाळांचे विद्यार्थी यंदा 12 वी साठी पात्र होते त्या विद्यार्थ्यांना शाळेतील व्यवसाय शिक्षक यांनी मार्गदर्शन करून रुग्णालयात शॉप आणि मॉल मध्ये 80 तास इंटर्नशिप करणयासाठी प्रोत्साहन देऊन संबंधित ठिकाणाहून परवानगी घेऊन विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण करून घेतली इंटर्नशिप मुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि आत्मविश्वास वाढतो तसेच विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर उभे रहाण्यास आणि नोकरीची संधी पण निर्माण होते इंटर्नशिप दरम्यान विद्यार्थ्यांचे उत्कृष्ठ काम पाहून उत्कृष्ठ विद्याथ्याना  जॉब संधी देण्याबाबत संबंधित मालकांनी सांगितले  म्हणून या कार्यक्रमास विशेष अस महत्व प्राप्त झाल्याने या प्रथम इंटर्नशिप पूर्ण करनाऱ्या विद्यार्थी कौतुक सोहळा आणि इंटर्नशिप साठी आपल्या शॉप , मॉल आणि रुग्णालयात  हेल्थकेअर व रिटेल अभ्यासक्रमाच्या 43 विद्यार्थ्यांना परवानगी देऊन प्रत्यक्ष कार्यनुभव  दिल्याबददल  माननीय डॉक्टर्स आणि प्रोप्रायटर यांचे आभार मानण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तर आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री इंगळे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत भारत सरकार राज्यशासन समग्र शिक्षा आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनि सरकारी शाळांना असं व्यवसाय शिक्षण मान्यता दिल्याबद्दल आभार मानले व्यवसाय शिक्षक श्री सदेश वाईलकर आणि श्री अभिजित लोखंडे सर यांनी आपल्या मनोगतात आम्ही शिकवत असलेल्या अभ्यासक्रम ,मेहेनत व विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे  विद्यार्थ्यांना उद्योजक होता येईल जॉब संधी निर्माण होत आहे याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रम सूत्रसंचालन  कु सोनी हागोने यांनी केले तर आभार कु अर्चना गावंडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment