तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

धार्मिक स्थळे,रुग्णालये, शैक्षणीक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापण्यास निर्बंध


परभणी, दि.16 :-  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आदेशित केले आहे की, जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणीक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23.05.2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक ईसमावर आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment