तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 March 2019

तालुकास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेत साक्षी वावरे सर्वप्रथम


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. ५ ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी शिवजन्म सोहळ्यात गेवराई तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेत कु. साक्षी सच्चिदानंद वावरे हिने सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. कु. साक्षी वावरे ही मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या र. भ. अट्टल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गेवराई येथील बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.
       खुल्या गटात शिवचरित्रातील प्रसंग व प्रतिके या विषयावर रांगोळी मध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचे चित्र रांगोळीत हुबेहूब चितारले होते. रविवारी, दि. ३ मार्च २०१९ रोजी शारदा विद्या मंदिर येथे झालेल्या समारंभात शिवजयंती उत्सव समितीचे संयोजक विजयसिंह पंडीत यांच्या हस्ते साक्षी वावरे हिला रुपये ७०००/- रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या गटासाठीचा पारितोषिकाचा मान पटकावणाऱ्या साक्षी वावरे हिने केंद्रीय युवा महोत्सवात सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात रांगोळी रेखाटली होती. 
     कला उपासक, होतकरू आणि विविध स्पर्धेत भाग घेणारी कुमारी साक्षी वावरे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. माणूस याबद्दल वडील श्री. सच्चिदानंद वावरे आई सौ. कविता वावरे, भाऊ शुभम यांनी आनंद व्यक्त केला तर गेवराईतील नागरिकांनी विशेषतः महिलांनी तिचे अभिनंदन केले आहे. गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनीही तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment