तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 March 2019

नगर परिषद जिंतूर अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसह विविध कामांचे आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उद्घाटन.
३६ कोटी ५० लक्ष रु.च्या विविध विकास कामांना सुरुवात

जिंतूर : १० मार्च  – नगर परिषद जिंतूर अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसह विविध कामांचे आ.बाबाजानी दुर्रानी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.विजय भांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिंतूर नगर परिषद अंतर्गत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागला असून पाणी पुरवठा योजने साठी नगरोत्थान योजनेतून २९ कोटी ९६ लक्ष रुपये एवढा निधी मंजूर आ.विजय भांबळे यांनी शासनाकडून मंजूर करून घेतला होता, या कामाचे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते आज रोजी इदगाह परिसरात उद्घाटन झाले.  या निधी अंतर्गत १० लक्ष लिटर पाणीसाठा असणारे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. तर जिंतूर शहरासाठी नवीन २ पाण्याच्या टाक्या एक नेमगिरी येथे तर दुसरी इदगाह मैदान जवळ बांधण्यात येणार आहे. येलदरी ते जिंतूर नवीन पाईप लाईन टाकण्यात येणार असून जिंतूर शहरात देखील वार्ड निहाय पाणी वितरण करण्यासाठी ६४ किमी एवढी नवीन पाईप लाइन बसवण्यात येणार आहे. 
तसेच विशेष वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून जमजम कॉलनी येथे शादीखाना २ कोटी १५ लक्ष यु.डी.६ अंतर्गत दर्गारोडवर पुलाचे बांधकाम ४८ लक्ष रस्ता अनुदान योजनेतून ५० लक्ष दलीतोत्तर निधितून ८० लक्ष,  नगरोत्थान योजनेतून ७० लक्ष व दलितवस्ती योजने अंतर्गत १.५० कोटी रु.च्या कामाचे उद्घाटने आजरोजी आ.विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले. 
नगर परिषद निवडणुकी दरम्यान आ.विजय भांबळे यांनी मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करत जिंतूर शहरात २४ तास पाणीपुरवठा करण्याबरोबर विविध विकास कामांना आज सुरुवात झाली. 
यावेळी आ.बाबाजानी दुर्रानी साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्वलाताई विश्वनाथ राठोड, तजमुल मौलाना, मौलाना मुफ्ती कलीम बेग मिर्झा, सिराज मौलाना, जलील मौलाना,तालुकाध्यक्ष मनोज थिटे, शहराध्यक्ष शौकत लाला, नगराध्यक्ष कपिल फारुकी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक शोएब जानिमिया, बाळासाहेब जाधव, मनोहर डोईफोडे, श्यामराव मते, रामराव उबाळे, फेरोज कुरेशी, शेख इस्माईल, अहेमद बागबान, दत्ता काळे, शाहेद बेग मिर्झा, दलमीर खान पठाण, उस्मान पठाण यांच्यासह करीम लाला, जाकेर बेग मिर्झा, शकील बेग मिर्झा, छोटू भाई, खालेक भाई, सलीम भाई (माजी उपनगराध्यक्ष), याया खां पठाण, मुसा भाई, बरकत लाला, मौजूद भाई, खय्युम भाई, मकसूद पठाण, आसेफोद्दिन काजी, बारी सर, फेरोज पठाण,  दिलीप घनसावंत, गब्बर घनसावंत, ज्ञानेश्वर मते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment