तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

परळीत काँग्रेसच्या वतीने महिला दिन साजरा
महिलांना सन्मान देण्याचे काम काँग्रेसने केले― प्रा टी पी मुंडे

काँग्रेसने नेहमीच महिला सक्षमीकरणाचे धोरण राबविले― सुनिता तायडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

परळी काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने आज महिला मेळावा घेऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला काँग्रेसने नेहमीच महिला सक्षमीकरणाचे धोरण राबविले असल्याचे प्रतिपादन महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुनिता ताई तायडे यांनी केले यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई पाडुळे यांची प्रमुख उपस्थिती होती         जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज परळी न.प.च्या माजी स्वच्छता व आरोग्य सभापती जयश्री ताई गित्ते-मुंडे यांच्या पुढाकाराने जवाहरलाल नेहरू वरिष्ठ महाविद्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सुनिता ताई तायडे यांच्या हस्ते प्रा टी पी मुंडे सर महिला काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्षा मीनाक्षीताई पाडुळे- पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले         यावेळी मार्गदर्शन करताना सुनिता ताई तायडे यांनी महिलांच्या विकासात काँग्रेसचे योगदान विशद करून काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळापासून महिला सक्षमीकरणाचे धोरण राबविल्याचे सांगितले महिलांना सर्वच क्षेत्रात काम करण्याची संधी काँग्रेसच्या विचारामुळेच मिळाली काँग्रेसच्या याच विचारातून सामान्य कुटुंबातील महिलाही आज सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करून सन्मानाने जगत आहेत त्यामुळे महिलांनी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी केले         अलीकडच्या काळात महीला वरील अत्याचार वाढत आहेत याला जबाबदार भाजपा सरकार च असल्याचा आरोप महिला मेळाव्याच्या संयोजिका जयश्रीताई रवींद्र गीते- मुंडे यांनी करून आगामी निवडणुकीच्या काळात महिलांनी भाजपा सारख्या जातीयवादी पक्षापासून सावध राहावे असे आवाहन केले तर काँग्रेसच महिलांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून देऊ शकते असा दावा महिला काँग्रेसच्या बीड जिल्हा अध्यक्षा मीनाक्षीताई पाडुळे- पाटील यांनी केला


         महिला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, दिवंगत पंतप्रधान इंदिरा जी गांधी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ,झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संदिपान मुंडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा अल्पणा लांडे यांनी केले याच मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांच्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment