तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 March 2019

यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी- उपप्राचार्या रजनी शिखरे


सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि .१४ ( प्रतिनिधी ) कवी, लेखक, राजकारणी, समाजसेवक, विचारवंत असे सर्वांगीण स्व. यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपप्राचार्या डॉ. रजनी शिखरे यांनी केले.
      गेवराई येथील आर.बी. अट्टल. महाविद्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या डॉ. रजनी शिखरे या होत्या. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्रबंधक बी.बी. पिंपळे यांच्या हस्ते स्व. चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. सिद्धेश्वर सटाले, डॉ. पांगरीकर, उपप्राचार्य प्रा. अशोक जगताप, पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र राऊत, डॉ. सचिन पगारे, प्रा. राजेंद्र बरकसे, डॉ. सुरेश पाटील, कार्यालय अधिक्षक भागवत गोंडी यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment