तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 March 2019

अखेर स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या आंदोलनाला यश  भोकरदन : राज्यातील 1628 शाळा व 2452 वर्ग तुकड्यांच्या वाढीव टप्पा अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी
भोकरदन(प्रतिनिधी):- काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 1628 शाळा व 2452 वर्ग तुकड्यांना पुढील वाढीव टप्पा अनुदानास मंजुरी मिळाली असून जालना जिल्ह्यातील सुमारे 45 शाळा व 90 वर्ग तुकड्यांना याचा लाभ मिळणार आहे.
वरील शाळा वास्तविक 100%अनुदानास पात्र असूनही शासनाने दि.19 सप्टेंबर 12016 च्या शासन निर्णय नुसार या शाळांना सरसकट 20%अनुदान देऊन बोळवन केली त्यानंतरही या शाळांना प्रचलित नियमानुसार पुढील टप्पे दिले नाहीत म्हणून स्वाभिमानी शिक्षक संघटनेने 19 सप्टेंबर 2016 चा शासन निर्णय रद्द करून 1628 शाळा व 2452 वर्ग तुकड्यांना प्रचलीत नियमानुसार अनुदान मिळावे या मागणीसाठी 157 दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन सुरू होते.या आंदोलनात उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई,राज्यमंत्री दर्जा ना.ज.मो.अभ्यंकर,दैनिक संध्याकाळ च्या संपादिका सौ.रोहिनीताई खाडिलकर यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व शालेय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांना भेटून सविस्तर चर्चा केली व या आंदोलनाची दखल घेत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्यास मंजुरी दिली त्यानुसार सदरील शाळांना 1 एप्रिल 2019 पासून 60% किंवा 80% टप्पा द्यायचा याची बैठकीत चर्चा झाली व येत्या 15 दिवसात तसा शासन निर्णय निर्गमित करण्याचे आदेश दिले अशी माहिती ना.सुभाष देसाई यांनी स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष के.पी.पाटील,ज्ञानेश्वर शेळके,बाळकृष्ण गावंडे,उमेशजी साखरे,नेहाताई गवळी,हनुमंत बिनवडे,देवीदास बोर्डे यांना दिली.महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाने जालना जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला असून त्यांनी मा.उद्धव ठाकरे,भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे मा.मुख्यमंत्री,मा.वित्तमंत्री,मा.शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासनाचे व वेळोवेळी संघटनेच्या बातम्या वर्तमानपत्रात देऊन शिक्षकांना सहकार्य करणाऱ्या सर्व पत्रकार मंडळींचे आभार मानले अशी माहिती संघटनेचे प्रदेश संघटक देविदास बोर्डे व जालना जिल्हाध्यक्ष संतोष गाडेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment