तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 2 March 2019

औष्णीक विद्युत केंद्र वाचविण्यासाठी परळीत होणार आंदोलन


अनेक संघटनांचा आंदोलनाला पाठींबा


महादेव गित्ते
-----------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी शहरातील औष्णीक विद्युत केंद्राचे संच एकामागून एक बंद पडत असून सर्वच संच बंद झाल्यास मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. मराठवाड्यात केवळ परळी येथेच औष्णीक विद्युत केंद्र असून मराठवाड्यास संजिवनी देणार्‍या प्रकल्पावर बंदची टांगती तलवार दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर औष्णीक विद्युत केंद्र (थर्मल) बचावसाठी क्रमबद्ध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला थर्मल पावर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर्स अ‍ॅण्ड सप्लायर्स असो. ने पाठींबा दिल्याचे अध्यक्ष अंगद हडबे यांनी सांगीतले. 
परळी वैजनाथ येथील संच क्र.4, 5, 6, 7, 8 मागील काही वर्षापासून विविध कारणे पुढे करुन बंद ठेवण्याचा प्रकार चालू आहे. विज केंद्र बंद असल्याने या भागातील विज केंद्रावर अवलंबून असणार्‍या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अडचणीत आला आहे. वास्तविक पाहता महापारेषणच्या भारनियामक केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्याही केंद्रातील सर्व संच बंद करता येत नाहीत. परंतु या नियमाला टाळले जात असून किमान एक तरी संच चालू ठेवावा अशी नियमकांची सुचना आहे. मराठवाड्यात दुष्काळ, वाढत चाललेली बेरोजगारी व केंद्र बंद असल्यामुळे कर्मचारी तसेच नागरिकांवर आलेली उपासमारीची वेळ लक्षात घेता एक तरी संच चालू करणे गरजेचे आहे. या मागणीसाठी आम्ही परळी शहरात मुख्यद्वार सभा घेण्यासोबत विविध क्षेत्रातील स्थानिक नागरिकांना भेटणार आहोत. दि. 8 मार्च रोजी औष्णीक विद्युत केंद्रासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली. हे आंदोलन एमएसईबी वर्क्स फेडरेशन, महाविज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजि.असो., विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन म.रा.विज संघटना, ग्रॅज्युएट इंजि. असो. विज निर्मिती कामगार संघटना, पावर फ्रन्ट मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आदी सहभागी होणार आहेत अशी माहिती समन्वयक अरुण गित्ते यांनी दिली. 
औष्णीक विद्युत केंद्र बचाव कृती समितीने सुरु केलेले आंदोलन अत्यंत महत्वाचे असून शासन परळीतील संपुर्ण विज निर्मिती थांबविण्याच्या प्रयत्नात आहे. कृती समितीने हाती घेतलेले आंदोलन महत्वचे असून आमचा कृती समितीच्या आंदोलनास सक्रीय पाठींबा असल्याचे थर्मल पावर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अ‍ॅण्ड सप्लायर्स असो. चे अध्यक्ष अंगद हडबे यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment