तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

मर्यादीत व्यक्ती व वाहनांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी मिळणार प्रवेश; आदेश लागू


परभणी,दि.16 :-  भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी कार्यक्रम दि.10 मार्च 2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश नसावा तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि ज्याअर्थी सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणने ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी  पी.शिवशंकर यांनी  फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत परभणी जिल्हयात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment