तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 31 March 2019

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे स्वा. रा. ती. रूग्णालयाला नवसंजीवनीकरोडो रुपयांचा निधी दिल्याने रुग्णालयाचा कायापालट - प्रशांत आदनाक

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- दि. ३०.....
    खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यामुळे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला नवसंजीवनी मिळाली आहे. परंतु विरोधकांना त्यांनी केलेली कामे दिसत नाहीत हेच दुर्दैव आहे, विरोधकांनी त्यांनी केलेली कामे एकदा पाहुन घेण्याची गरज असल्याची जळजळीत टीका करून खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी करोडो रुपयांचा निधी देऊन रूग्णालयाचा कायापालट केला असल्याचे स्वा. रा. ती. अभ्यागत मंडळाचे सदस्य प्रशांत आदनाक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
      अंबाजोगाई रूग्णालयाची दुरावस्था असल्याचे विरोधकांकडून जाणीवपूर्वक सांगितले जात आहे. त्यावर प्रशांत आदनाक यांनी सडकून टीका करून डॉ. प्रितमताई मुंडे यांनी रूग्णालयात केलेल्या सुधारणांचा तपशीलच दिला आहे. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएसच्या ५० वाढीव जागांना अंतिम मान्यता मिळाली, रुग्णालयाच्या  ओपीडी विभागाची अत्याधुनिक व सुसज्ज इमारत बांधण्यासाठी ६५ कोटींचा निधी दिला, आज ही नवीन ओपीडी इमारत रुग्णांच्या सेवेत उभी आहे. तसेच रुग्णालय परिसरात मुलांचे व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचे कामही सुरु आहे. स्वा.रा.ती. रुग्णालय परिसरात नवीन सर्जिकल बिल्डिंग, लायब्ररीसह धर्मशाळा, रुग्णांसाठी निवारा कक्ष, वार्ड आरओ वॉटरची सुविधा असे रुग्णांना दिलासा देणारे काम खा. प्रितमताई मुंडे यांनी केले असल्याचे आदनाक यांनी सांगितले.
     रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्या साडेचार वर्षात एकूण चाळीस कोटी रुपये किंमतीची नवीन अत्याधुनिक यंत्रसामुग्री खा.प्रितमताईनी उपलब्ध करून दिली आहे. सोनोग्राफी विभाग , अस्थिरोग विभाग यात नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात व एमडी-एमएस च्या जागा वाढवण्यात खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेला यशस्वी पाठपुरावा उपयोगी आल्याचे प्रशांत आदनाक यांनी सांगितले. यासह अनेक कामे डॉ. प्रितमताईंच्या माध्यमातून सुरू आहेत. ही कामे विरोधकांना दिसत नाहीत, अशा विरोधकांनी मुंडे भगिनींनी केलेली विकास कामे पाहून घेण्याची गरज असल्याचेही आदनाक म्हणाले. जनतेने विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment