तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

जलसाक्षरता जलसंवाद यात्रेचे लिंबूटा येथे उत्साहात स्वागतमहादेव गित्ते
--------------------------------
परळी वैजनाथ , दि. 27 (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लिंबुटा येथे मंगळवार दि. 26 फेब्रुवारी रोजी सायं 7 वाजता जलसाक्षरता संवाद यात्रेचे आगमन झाले.                                 ग्रामस्थांनी या यात्रेचे वत्साहात स्वागत केले. यात्रेचे निमंत्रक नरेंद्र च्युग यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. दुष्काळापासून मुक्तता हवी असेल तर 'पाणी      आडवा पाणी जिरवा' या सारखी कामे स्वयंप्रेरणेने हाती घावी लागतील असे मत श्री. च्युग यांनी या वेळी व्यक्त केले.
    महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भ या दोन भागांनाच सर्वाधिक भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जलसाक्षरतेची सर्वाधिक गरज या दोन भागांना आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्रसिह राणा व वन व अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठावाडा व विदर्भासाठी 14 फेब्रुवारी पासून चंद्रपूर जिल्ह्यातुन या यात्रेस प्रारंभ झाला आहे. लातूर जिल्ह्यातून मंगळवारी बीड जिल्ह्यात या यात्रेचे आगमन झाले. यात्रेचे निमंत्रक नरेंद्र च्युग , लक्ष्मण इंगळे, मुक्तारांम सोनवणे आदींचा यात समावेश आहे.
      विहीर पुनर्भरण ,सिमेंट बंधारे, नाला बांध, मतिबांध , शेततळे ,बांधबंदीस्ती  अशी जलसंधारण व मृद्धसंधारणाची कामे आता आपल्याला हाती घ्यावी लागतील तरच जुनपासून पंडणाय्रा पावसाचा  पुरेसा लाभ होईल असे ही श्री. च्युग यांनी या वेळी सांगितले.
      दरम्यान , बुधवार दि. 27 रोजी सकाळी तडोळी येथील ग्रामस्थांशी या यात्रेतील सदस्यांनी संवाद साधला. शेतकय्रांचे म्हणणे ऐकुण घेउन जलसंधारण व मृद्ध संधारण कामे हाती घावे, लागतील तरच दुष्काळा पासून मुक्तता होईल. पाण्याचा वापरही जपून करावा लागेल. अशे मत श्री. च्युग यांनी व्यक्त केले.यावेळी प्रा. पुरुषोत्तम चिलपिंपरे, संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेचे सचिव अशोक मुंडे, पांडुरंग दुगाने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment