तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

परभणी लोकसभा: निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार सिंग सामान्य जनतेच्या संपर्कासाठी उपलब्धपरभणी, दि.२९- भारत निवडणूक आयोगाने १७- परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी राजेंद्र कुमार सिंग यांची निवडणूक निरीक्षक (जनरल) म्‍हणून नियुक्‍ती केली आहे.

 निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार सिंग यांचे वास्‍तव्‍य निवडणूक काळात
वैज्ञानिक भवन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी
येथे आहे. त्‍यांच्‍या कक्षाचा  दुरध्वनी क्र ०२४५२-२२३८५४
भ्रमणध्‍वनी क्र. ९०७५०१५२२४ व ईमेल पत्ता obgenparbhani2019@gmail.com
असा आहे.१७- परभणी लोकसभा परिक्षेत्रातील नागरिकांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात आपल्‍या काही तक्रारी असतील, तर  निवडणूक  निरीक्षक यांच्‍याशी संपर्क  साधावा.
श्री  सिंग हे सकाळी १० ते १२ या दरम्‍यान सर्वसामान्‍य जनतेसाठी उपलब्ध आहेत. त्‍यांचे तात्‍पुरते निवासस्‍थान म्‍हणजेच वैज्ञानिक भवन,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे
निवडणूक निरीक्षक यांच्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी १७- परभणी लोकसभा मतदार संघ यांनी केले आहे.

No comments:

Post a comment