तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

निरोप समारंभ व शेला पागोटे कार्यक्रम संपन्न


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी 
सोनपेठ : येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून  सोनपेठ चे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार होते याप्रसंगी मंचावर भगवानराव मस्के, मुख्याध्यापक सुमित लांडे, रो.प्रदीप गायकवाड, जयसिंगराव देशमुख, प्रा. डॉ.प्रकाश सुर्वे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील, गणेश पाटील हे उपस्थित होते.
शहरातील कै. रमेश वरपुडकर वरिष्ठ महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप, विविध उपक्रमाचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरण व मराठी भाषा गौरव दिन असा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी गौरव दिनानिमित्त मराठी विभागातर्फे भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केले. सूत्रसंचलन डाॅ. बाळासाहेब काळे व प्रा. विठ्ठल जायभाये यांनी तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉक्टर मुकुंदराज पाटील यांनी मानले.
दुपारच्या सत्रात सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या शेला पागोटे या कार्यक्रमात शेला पागोट्यांचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.सखाराम कदम यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सा.द.सोनसळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments:

Post a Comment