तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 March 2019

खासदार निधीवरून डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्यावर टिका करणा-या विरोधी पक्षनेत्यांचा खोटेपणा उघड !


पांच वर्षात खासदार निधीतून २६ कोटीच्या ७७९ कामांना प्रशासकीय मान्यता ; १३ कोटी ७० लाखाची कामे पूर्ण - नियोजन विभागाची माहिती

बीड (प्रतिनिधी) :-  दि. १८ ----- खासदार निधीवरून डाॅ प्रितमताई मुंडे यांच्यावर टीका करणा-या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जिल्हा नियोजन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पांच वर्षात खासदार निधीतून २६ कोटीच्या ७७९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून १३ कोटी ७० लाखाची ५२८ कामे देखील पूर्ण झाली असल्याचे पुढे आले आहे.  या आकडेवारीमुळे राष्ट्रवादीचे नेते आता पुरते तोंडघशी पडले आहेत. 

   खासदार फंड खर्च न करणा-या भाजप खासदाराला मतदान करणार का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केज येथे एका बैठकीत करून खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्यावर टीका केली होती. कुठलीही माहिती न घेता किंवा खातरजमा न करता  ऐकीव माहितीच्या आधारे त्यांनी खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे यांच्यावर टीका केली होती. ही टीका राजकीय द्वेषातून केली असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसे पाहू जाता त्यांनी आतापर्यंत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे किंवा खासदार डाॅ प्रितमताई यांच्यावर जे जे आरोप केले त्यात कुठलेच तथ्य नसते हे वेळोवेळी उघड झाले आहे,  आता पुन्हा एकदा या प्रकाराने ते  तोंडघशी पडले असल्याचा पलटवार भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केला आहे. 

नियोजन विभागाचे सत्य ; डोळे उघडून पहा
-------------------------------
खासदार-आमदार निधीच्या खर्चाचा वार्षिक ताळेबंद आखणा-या शासनाच्या जिल्हा नियोजन विभागाने खासदारांच्या शिफारशीने गेल्या पांच वर्षात किती निधी प्राप्त झाला आणि किती खर्च झाला याची आकडेवारी दिली आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत खासदार निधीतून  २६ कोटी ११ लाख ६४ हजार इतक्या निधीच्या ७७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून पूर्ण झालेल्या कामांची संख्या ५२८ इतकी आहे, त्यावर १३ कोटी ७० लाख ७२ हजार इतका खर्च झाला आहे. केंद्र सरकारकडून १२ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाल्याचेही विभागाने म्हटले आहे. दरम्यान, आमच्या नेत्यांवर टीका करण्याआधी धनंजय मुंडे यांनी नीट माहिती घ्यावी असा सल्लाही जिल्हाध्यक्ष पोकळे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment