तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 March 2019

डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ विविध भागात प्रचारफेरी; परळी शहर झाले कमळमयलाडक्या लेकीला देणार ऐतिहासिक मताधिक्य; शहरात प्रितमताईचीच लाट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि.30........ खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या विविध भागात आज भाजप-शिवसेना-रिपाइं- रासप- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. घरोघरी पोस्टर, बॅनर, पॉम्पलेट पोंहचत असल्याने शहर कमळमय झाले आहे. दरम्यान, डॉ. प्रितमताई मुंडे आमची लाडकी लेक असुन आम्ही त्यांना मागच्या वेळेस पेक्षा जास्त मताधिक्य देणार असल्याची ग्वाही मतदारांनी दिली. शहरात आपल्या घरचा उमेदवार अशी भावना निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे तर चोहीकडे प्रितमताईंचीच लाट असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे.
आज शनिवार, दि.30 रोजी शहराच्या विविध भागात कार्यकर्त्यांनी भव्य रॅल्या काढून वातावरण ढवळून काढले. सकाळपासूनच वेगवेगळ्या भागात रॅल्या सुरू झाल्या. येऊन येऊन येणार कोण.. प्रितमताई शिवाय दुसरे कोण..., फिर एक बार मोदी सरकार.... महायुतीचा विजय असो... पंकजाताई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है... अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणुन गेला होता. आज सकाळी गाव भागात हनुमान नगर, पाढंरीचा मळा येथे फेरीचे आयोजन करण्यात आले या वेळी माजी नगराध्यक्ष श्री वैजनाथ तात्या जगतकर परळी शहर भाजपा उपाध्यक्ष श्री महादेव इटके, विकास हालगे, नरेश पिंपळे, सुशील हरुगुंळे, पवन तोडकरी, बंडू चौंडे, विष्णूपंत कुलकर्णी, गजुजी राजनाळे, संदीप बावगे, खाजा थलकरी, अरविंद सातसमुद्रे, जितेंद्र ईटके शंकर स्वामी आदी उपस्थित होते

डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शहराच्या विविध भागात प्रचार फेरी, नागरीकांची मोठी उपस्थिती

परळी वैजनाथ दि. 29...
      खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ परळी शहराच्या विविध भागात भाजप - शिवसेना - रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांना झालेल्या विकास कामांची माहिती दिली. घरोघरी जाऊन ना. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी परळी शहर आणि वैद्यनाथ मंदिरासाठी आणलेल्या निधीची माहिती दिली. यावेळी मतदारांनी डॉ. प्रितमताई यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याचे सांगितले.
      ना. पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सुभाष चौक,भिमवडी,सिद्धार्थ नगर,आझाद नगर,काकर मोहल्ला,जुने रेल्वे स्टेशन आदी परिसर अक्षरशः पिंजून काढला. प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष जुगरकिशोर लोहिया, विजयकुमार वाकेकर, शांतीलाल लाहोटी, शालिनीताई कराड, मंगलाताई लींगाडे, दिलीप बद्दर, भोजराज पालीवाल, नारायण सातपुते, रवींद्र परदेशी, भाऊराव भोईटे, महेश केंद्रे, प्रितेश तोतला, मोहन जोशी, पवन मोदाणी, नितीन समशेट्टी, सचिन गित्ते, अनिस अग्रवाल आदी मान्यवरांच्या हस्ते प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली.
      यावेळी सय्यद जहीर, फैसल कुरेशी, शेख अतीक , शेख़ गफ्फार,अनीस कुरेशी,हकीम कुरेशी,सय्यद चा॑द, सय्यद अनीस, शेख अय्युब, गोविंद चौरे, सुनील कांबळे, राम मुंडे,वेदांत सारडा,सुभाष सावंत,अशोक पोटभरे,अनिल कांबळे,महादेव व्हावळे,किशोर बहादूरे,बळीराम व्हावळे,शिवा व्हावळे,सिद्धार्थ उजगरे,यश खरे,संघपाल सावंत,संजय उजगरे,सचिन डबडे, बालु फड, सुनील होके,कपिल होके, राहुल गोदाम, सुनिल कांबळे, विजय व्हावळे, सचिन लांडगे, गणेश घांडगे, गंणेश लाडगे, रायभोळे, प्रतिक मस्के, चिव रोडे, मिलिंद लिद लाडगे, निखिल रायभोळे, धनदिप तरकसे, आदर्श मस्के, भिवा कांबळे, राजु कांबळे, शनी सावंत आदींसह भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांनी आमच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून देणार असल्याचे सांगितले.
        विद्यानगर भागामध्येही भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मुंडे भगिनींनी केलेल्या कामाची माहिती दिली. या प्रचार फेरीला भाजपा जेष्ठ नेते दासु वाघमारे, योगेश मेनकुदळे, नरसिंग सिरसाट, अरूण पाठक, बालु जोगदंड , सत्यप्रकाश कराड, गोपी कांगने, प्रशान्त जोगदंड, राजेश अघाव , राहुल वाघमारे, सतीश कराड, बबलू चाटे, कृष्णा सातपुते, रोहित खाड़े, आकाश देशमुख, नरेश कुटे, किशोर तिथे, विजय हजारे, विजय चव्हाण  आदी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी शिवसैनिक सरसावले

गल्लोगल्ली फिरून मतदारांशी साधला संवाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. 30.....
     बीड लोकसभा मतदार संघाच्या भाजप - शिवसेना - रिपाइं - रासप - रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आज शहराच्या विविध भागात प्रचार फेरी काढुन मतदारांशी संवाद साधला. शहराच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
        भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती सेनेची युती झाल्यापासून सर्वच पक्षांचे पदाधिकारी एकदिलाने कामाला लागले आहेत. परळीच्या शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी प्रचारात जोरदार सहभाग घेतला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागले असून गल्लोगल्ली जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी आज गंगासागर नगर, कृष्णा नगर  , सिद्धेश्वर नगर, खुदबे नगर या भागात प्रचार फेरी काढुन मतदारांच्या भेटी घेतल्या.
       शिवसैनिकांनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. सुभाष चौक, नुरानी मजीत एरिया, काकर मोहल्ला, आझाद नगर, सिध्दार्थ नगर, भीमवाडी आदी भागातून भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या रॅलीत शिवसेनेचे नेते तथा वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायण सातपुते, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोईटे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बद्दर, विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख महेश केंद्रे, प्रकाश साळुंके आदी सहभागी झाले होते.              ‌

No comments:

Post a comment