तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 1 March 2019

आयोध्येचं राम मंदिर कधी होईल माहिती नाही पाथरीत इतिहास घडला-हरीषचैतन्यानंद सरस्वती
किरण घुंबरे पाटील
पाथरी:-  जी माणसे विचारी असतात तीच समाजाच्या उपयोगी पडतात आयोध्येच्या मंदिराचा वाद अनेक वर्षा पासून सुरू आहे पाथरीत मात्र आमदार बाबाजानी दुर्रानी साहेबांनी जुन्या श्रीराम मंदिराचा जिर्णोध्दार करून इतिहास घडवला असल्याचे प्रतिपादन  प.पु.परिव्राजकाचार्य श्री श्री १००८स्वामीहरीषचैतन्यानंद सरस्वती महाराजांनी पाथरी शहरातील जुन्या श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धार कार्यक्रमाच्या भुमीपूजना नंतर झालेल्या प्रवचनात केले.
 आणि इतिहास घडवतात.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आ बाबाजानी दुर्रानी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि प चे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर हे होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की चारित्र्यवान माणूसच भगवान बनत असतो. प्रत्येक व्यक्तिच्या अंगात समन्वयाचा दृष्टीकोण असला पाहीजे त्याची कॅटेगीरी ही व्यक्ती मत्वावर अवलंबुन असते.असे सांगुन मनातील दुर्गुन बाजुला सारा मानवता हाच धर्म आहे जाती पाती ह्या आपणच निर्माण केल्या आहेत.उचनिच मानव जातीच मानते,प्राण्यां मध्ये जिवन जगण्या साठी असा प्रकार दिसून येत नाही.इथे मात्र एखादे काम करावयाचे झाले तर माणसांना समजाऊन सांगितलं जात सर्व प्राण्यात माणसालाच बुद्धी दिली तरीही कलह,व्देश भावना ठेवली जाते.समन्वय, एकता हीच सर्व धर्माची शिकवन असून. आज आमदार दुर्रानी मुळे हा प्रसंग सर्वांनी अनुभवला हा इतिहास घडला असे ते म्हणाले.

सर्व समावेशक कामे करण्याचा प्रयत्न-  आ दुर्रानी

यावेळो मनोगत व्यक्त करतांना आ बाबाजानी दुर्रानी म्हणाले की आपल्या राजकीय कारकिर्दी मध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्दती मी सुरूवाती पासुन अवलंबली असून शहरातील सतरा मंदिरांना सभामंडप दिले आहेत.हे श्रीराम मंदिर पुरातन असून आम्ही शाळेत जातांना उशिर झाल्यास येथे लपुन बसायचो मात्र माहित नव्हते की हे श्रीरामाचे मंदिर आहे म्हणून हेच पुरात असलेले मंदिर पुर्णत:  जिर्ण झाले होते केवळ अवशेष शिल्लक होते.याचा पुर्ण जिर्णोद्धार आता होणार आहे.चुकून अजुन एखादे धार्मिक स्थळ राहीले असल्यास सांगावे असे आवाहन शहर वाशियांना केले.
या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती म्हणून रा काँचे जेष्ठ नेते मुंंजाजी भाले पाटील,गंगाधरराव गायकवाड, नगराध्यक्षा मिनाताई भोरे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्रानी, भावनाताई नखाते, मिराताई टेंगसे,दादासाहेब टेंगसे, डॉ जगदिश शिंदे, सुभाष आबा कोल्हे, चक्रधरराव उगले,आशोकराव गिराम, महादेवराव जोगदंड, मनुगुरू कानशुक्ले, तारेख खान दुर्रांनी, अॅड कालिदासराव  चौधरी, न प गट नेते जुनेदखान दुर्रानी, सभापती शिवकन्या ढगे, राकाँ तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष कल्याण चौधरी, नगरसेवक मंगलताई रिंकू पाटील, अर्पिताताई अलोक चौधरी, महादेवराव खारकर, गुंफाताई भाले आणि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमा साठी गजानन उंबरकर, प्रशांत चिद्रवार, विष्णू ढेरे, संजय हराळे, अरुन जोशी, पांडूरंग क्षिरसागर, पिंटू चिकने, प्रविण पाठक, अजय वांगिकर यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment