तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 March 2019

निवडणूक कालावधीमध्ये जात,धर्म आणि भाषावार शिबीरांच्या आयोजनास प्रतिबंध



परभणी, दि. 16 :-   भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी कार्यक्रम दिनांक.10.03.2019 रोजी घोषीत केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहीता अंमलात आलेली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात,भाषा आणि धार्मिक शिबीरांचे, मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

परभणीचे जिल्हादंडाधिकारी पी.शिवशंकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेशित केले आहे की, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबीरांचे आणि मेळाव्यांचे आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक.23.05.2019 पर्यंत) निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीवर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment